Mumbai Goa Highway 
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर दर 15 किमीवर सुविधा केंद्र, कोणत्या सुविधा मिळणार?

गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचा वायदा महाराष्ट्र सरकारने केला आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: गणेशोत्सव काही दिवासांवर येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन सुरू करण्याचा वायदा महाराष्ट्र सरकारने केला आहे. त्या दृष्टीने महामार्गाचे काम जोमात सुरू आहे.

राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यात जातीने लक्ष घालताना दिसत असून, कामाचा वारंवार आढावा घेत आहेत. कशेडी घाटातील बोगदा खुला केल्यानंतर आता महामार्गावर सुविधा केंद्राचे उद्धाटन करण्यात आले आहे.

'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आणि वाहन चालकांना अल्पोपहाराची सुविधा मिळावी, त्याचप्रमाणे प्रवाशांना शौचालयाची व्यवस्था व्हावी; या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.'

'आज खारपाडा येथील सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून, या सुविधा केंद्रावर प्रथमोपचार, शौचालय व्यवस्था आणि चहाचा स्टॉल अशा सुविधा आहेत. प्रवास लांबचा असल्याने मुंबई गोवा महामार्गावर खारपाड्यापासून दर पंधरा किलो मीटरवर अशा प्रकारची सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहे.'

'यामुळे कोकणवासीयांचा प्रवास तर सुखकर होईलच, त्याचबरोबर या सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विविध सुविधा मिळतील.' असे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कशेडी बोगद्यातील सिंगल लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी ते पोलादपूर हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार करता येईल आणि प्रवाशांचा बराच वेळ वाचेल. यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही निश्चितच हा बोगदा सुरू झाल्यामुळे फायदा होईल. असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

तसेच, महामार्गाचे उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण करून संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असं आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT