पत्रकार परिषदेत बोलताना हेंद्रिक गांधी सोबत स्वस्त धान्य दुकान मालक. Dainik Gomantak
गोवा

Goa: नागरी पुरवठा खात्याकडून स्वस्त धान्य दुकान मालकांना मिळणाऱ्या सुविधा बंद

या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात आणि पुढील तीन आठवड्यात जर आमच्या मागण्या मान्य होत नाही तर आम्ही नोव्हेंबर महिन्याचा कोटा उचलणार नाही असा इशारा मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान मालकांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: स्वस्त धान्य दुकान मालकांना मिळणारे कमिशन पुरेसे नाही. तसेच पीओएस मशीनचे भाडे (पॉस), नागरी पुरवठा विभाग देत असलेले पेपर रोल बंद केल्याने तसेच वाहतूक भत्ते, मजूर शुल्क, अन्नधान्याचे नुकसान आणि कमिशन एकत्रितपणे अनेक महिने दिले जात नाही. या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात आणि पुढील तीन आठवड्यात जर आमच्या मागण्या मान्य होत नाही तर आम्ही नोव्हेंबर महिन्याचा कोटा उचलणार नाही असा इशारा मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान मालकांनी दिला आहे.

(facilities provided by Civil Supplies Department to cheap grain shop owners are closed )

नागरी पुरवठा खात्याकडून स्वस्त धान्य दुकान मालकांना मिळणाऱ्या सुविधा बंद झाल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानावर देण्यात आलेली पीओएस मशीन अव्यवहार्य झाली आहे. मिळणारे कमिशन पुरेसे नाही. कारण आम्हाला पीओएस मशीनचे भाडे, विभाग देत असलेले पेपर रोल बंद केले आहेत. वाहतूक भत्ते, मजूर शुल्क, अन्नधान्याचे नुकसान आणि कमिशन एकत्रितपणे अनेक महिने दिले जात नाही. कार्ड धारकाचे नातेवाईक, नोकर किंवा शेजाऱ्यांना आम्ही जे अन्नधान्य द्यायचे ते शक्य नाही. कारण सेल्फ अँथॅटीकेशनची प्रणाली अचानक बंद झाली आहे. व्यवहारिकदृष्ट्या केवळ 40 ते 50 टक्के शिधापत्रिका व्यवहारीक रित्या रेशन गोळा करण्यासाठी येतात. कारण तांदूळ आणि गहू यांचे प्रमाण कमी आहे.

कुटुंबासाठी फक्त नऊ किलो तांदूळ आणि पाच किलो गहू पुरेसे नाही. आता ऑक्टोबर महिन्याचा धान्य कोटा वाढवून दिला असला तरी पीओएस मशीन मध्ये प्रत्यक्ष हा धान्य कोटा दाखवला जात नसल्याने आपणही तो देऊ शकत नाही.त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागते. मशीन मध्ये प्रमाणीकरण करण्यासाठी एका रांगेत अनेक वेळ मशीनमध्ये बिघाड होऊन बराच वेळ वाया जातो आणि त्यामुळे डीलर्सना अडचणीचा सामना करावा लागतो असे मुरगाव तालुका स्वस्त धान्य दुकान मालक संघटनेचे अध्यक्ष हेंद्रिक गांधी यांनी बोलताना पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. दरम्यान येणाऱ्या अडचणी व मागण्या पुढील तीन आठवड्याच्या आत पूर्ण केल्या नाही तर नोव्हेंबरचा धान्य कोटा न उचलण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT