On extension of academic year in the state
On extension of academic year in the state 
गोवा

राज्यातील शैक्षणिक वर्ष लांबणीवर

Dainik Gomantak

पणजी,

राज्यातील शैक्षणिक वर्ष दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते, मात्र यंदाच्या वर्षी या शाळा ठरल्यानुसार सुरू न होता त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यासंदर्भातचा आदेश शिक्षण संचालक वंदना राव यांनी आज
केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्याने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे काढला आहे.
यापूर्वी राज्यातील सर्व शाळांना शैक्षणिक वर्ष ठरल्यानुसार सुरू होईल असे शिक्षण संचालनालयाने कळविले होते. मात्र केंद्राकडून टाळेबंदीमध्ये नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये टाळेबंदी असेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या धर्तीवर संचालकांनी हा आदेश जारी केला आहे.
कोविड - १९ या महामारीची स्थिती लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने ३० मे रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने शाळांमध्ये व कोचिंगसाठी कोणत्याही विद्यार्थ्याला परवानगी दिली जाणार नाही. राज्यातील विविध घटकांशी सल्लामसलत केल्यानंतर व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व मानव मंत्रालयाने जारी केलेल्या पुढील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने शाळा पुन्हा सुरू करण्याच्या नव्या तारखांबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे राव यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT