Railway | Train  Canva
गोवा

Kokan Railway: तूर्तास कोकण रेल्वे बोरीवलीपर्यंत नेण्यात अडथळे; प्रवाशांची गणेशोत्सवानिमित्त मागणी

Kokan Railway Update: दिल्लीत येणाऱ्या गाड्या हजरत निझामुद्दिन स्थानकापर्यंतच जातात, त्या धर्तीवर पनवेलपर्यंतच आता गाड्या धावू शकतील

गोमन्तक डिजिटल टीम

Kokan Railway News

पणजी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा विस्तार बोरीवलीपर्यंत करावा, अशी मागणी प्रवाशांनी कोकण रेल्वे महामंडळाकडे केली आहे. असे असले तरी मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या पाहता तूर्त तरी ही मागणी मध्य रेल्वेकडून मान्य केली जाण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली भागात कोकण परिसरातील अनेकांनी स्थलांतर केले आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून महामंडळाकडे विविध रेल्वे सेवांचा विस्तार बोरीवलीपर्यंत केला जावा, अशा मागण्या होत असतात. गणेश चतुर्थी जवळ आली की, महामंडळाला यासंदर्भातील निवेदने सादर केली जातात. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या सुटतात. त्यातील गाड्यांच्या सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारल्या जाव्यात, अशीही मागणी आहे.

सध्या सीएसटी, कुर्ला, दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्यांचा विस्तार बोरीवलीपर्यंत करण्याचा विचार केला जाऊ शकत नाही, असेही सांगण्यात आले आहे.

पनवेलपर्यंतच धावणार ‘कोरे’

मध्य रेल्वेच्या कारभारावर सध्या ताण आहे. देशभरातून मुंबईत रेल्वे गाड्या येतात. दिल्लीत येणाऱ्या गाड्या हजरत निझामुद्दिन स्थानकापर्यंतच जातात. त्या धर्तीवर पनवेलपर्यंतच आता गाड्या धावू शकतील. तेथून लोकल पकडून मुंबईत जाण्याचा पर्याय प्रवाशांना द्यावा, यावर विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT