Govind Gaude Meeting  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: गोविंद गावडे मोठा निर्णय घेणार? मंत्रिपदावरुन हकालपट्टीनंतर कार्यकर्त्यांची बोलावली महत्वाची बैठक

Goa politics update: या घडामोडीनंतर माजी मंत्री गोविंद गावडे रविवारी प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत

Akshata Chhatre

Ministerial Exit Goa: आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सार्वजनिक टीका केल्याने मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या घडामोडीनंतर, माजी मंत्री गोविंद गावडे रविवारी (दि. २२) प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. माशेल येथे संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिपद गमावण्यामागील घडामोडी

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला होता आणि १८ जून रोजी त्याची अंमलबजावणी झाली. दिल्लीतील निर्णयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मंत्री गावडे यांना निष्कासित करण्याचा निर्णय घेतला. २०२७ च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना, गावडे सध्या भाजप पक्षाविरोधात थेट आवाज उठवण्याची शक्यता कमी आहे, कारण तसे केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुढील वाटचाल आणि संभाव्य रणनीती

'उटा' (UTA) या आदिवासी संघटनेचा माजी मंत्री गावडे यांना पूर्ण पाठिंबा असल्याने, ते या समूहाला अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.

मंत्रिपद अचानक गेल्यामुळे गोविंद गावडे यांच्या समर्थकांचा विश्वास डळमळू शकतो. त्यामुळे, हा विश्वास कायम ठेवण्यासाठी गावडे नक्कीच प्रयत्न करतील. पुढील निवडणुकीत अपक्ष म्हणून लढून जिंकायचे असल्यास, आतापासूनच योग्य रणनीती आखणे गावडे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील असे दिसते.

मंत्रिमंडळातून निष्कासित केल्यानंतर गावडे बंड पुकारतील, सरकारवर टीका करतील की मतांचे विभाजन करतील, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, गोविंद गावडे अशी कोणतीही कठोर भूमिका घेण्याची शक्यता कमी असल्याचे अनेकांचे मत आहे.

गावडे यांची पहिली प्रतिक्रिया

पक्षातून निष्कासित झाल्यानंतर गोविंद गावडे यांनी प्रतिक्रिया दिली होती की, "दबलेल्या लोकांची बाजू घेतली याची पावती गोव्याच्या पवित्र क्रांतीदिनी मिळाली, यापेक्षा मोठे भाग्य असूच शकत नाही. ज्या गोष्टीसाठी सरकारने ही भूमिका घेतली, त्या संघर्षाचा आवाज होण्यासाठी मला मोकळे केले, यासाठी मी माझा पक्ष आणि सरकाराचे आभार मानतो. सत्ता आणि सत्य यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नेहमीच सत्याची निवड करेन." त्यांच्या या वक्तव्याने त्यांची भू्मिका काय असेल याची उत्सुकता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT