Calangute police Arrested 3 Person Dainik Gomantak
गोवा

Tourist Attacked in Goa: कळंगुटमध्ये केरळच्या पर्यटकांवर परप्रांतीयांचा हल्ला; तिघा संशयितांना अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

Tourist Attacked in Calangute Goa: आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून गोवा प्रसिध्द आहे. गोवा फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. याच पर्यटकांवर राज्यात हल्ला होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

दिल्लीतील पर्यटकावर चाकू हल्ल्याचे प्रकरण, गाडीला ओव्हरटेक केले म्हणून महाराष्ट्रातील पर्यटकावर हल्ला अशी पर्यटकांवर हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

दरम्यान पर्यटकांवर हल्ला झाल्याची नवी घटना आज समोर आली आहे. कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये पर्यटकांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोर पर्यटकांचे मोबाईल फोन हिसकावून पसार झाले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केरळ येथील पर्यटक पर्यटनासाठी गोव्यात आले होते. ते हॉटेलमधील त्यांच्या खोलीकडे जात असताना ओशॅनिक शॅक बार्देश येथे जवळ पोहोचले असता चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली.

या मारहाणीत ते जखमी झाले. यावेळी संशयितांनी फिर्यादी व त्याच्या 3 मित्रांचे अंदाजे 1 लाख 80 हजार रुपयांचे मोबाईल फोन हिसकावून नेले. याबाबतची तक्रार पर्यटकाने कळंगुट पोलिसांत दाखल केली.

तक्रारीची दखल घेत कळंगुट पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोणत्याही सुगाव्याशिवाय आरोपींचा शोध घेणे आव्हान होते परंतु, माहिती मिळविण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आल्याने आरोपींना पणजीमध्ये अटक करण्यात यश आले.

श्रीनिवास लमाणी (23), शिव लमाणी (22), अखिलेश चव्हाण(19) तिघेही मूळ रा. कर्नाटक अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. चौकशीत संशयितांनी फिर्यादी पर्यटकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT