Illegal liquor Dainik Gomantak
गोवा

अबकारी खात्याची मोठी कारवाई, 2 लाख 4 हजार रुपयांचा अवैद्य दारु साठा केला जप्त

अबकारी खात्याच्या काणकोण (Canacona) अधिकाऱ्यानी काराशिरामळ आगोंद येथील एका येथील घाऊक दारू दुकानातून 2 लाख 4 हजार रूपयांचा अवैद्य मद्यार्क जप्त केला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: अबकारी खात्याच्या काणकोण अधिकाऱ्यानी काराशिरामळ आगोंद येथील एका येथील घाऊक दारू दुकानातून 2 लाख 4 हजार रूपयांचा अवैद्य मद्यार्क जप्त केला. अबकारी खात्याच्या काणकोण (Canacona) अबकारी अधिक्षक चंद्रनाथ देसाई (Chandranath Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यानी काराशिरामळ आगोंद येथील एका येथील घाऊक दारू दुकानावर छापा टाकून 2 लाख 4 हजार रूपयांची 783 लिटर्स परदेशी बनावटीचा अवैद्य मद्यार्क जप्त केला.आज रात्री अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.या कारवाईत अबकारी कार्यालयाचे आशिष गावकर,आनंद वेळीप, विनोद नाईक,आशिष गावकर,दत्ता गावकर यांचा सहभाग होता. (Excise Department Seizes Illegal liquor Worth Rs 2 lakh 4 Thousand)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अबकारी खात्याच्या काणकोण अधिकाऱ्यानी गुळे येथील एका दुकानावर छापा टाकून 3 लाख 77 हजार रुपयाचा अवैध दारु जप्त केला.एका किरकोळ दारू विक्री दुकानातून हा अवैध परदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली असे अबकारी खात्याचे अधिकारी शेखर देसाई यांनी सांगितले.हा अवैध मद्यार्क अबकारी खात्याने पंचनामा करून ताब्यात घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT