MLA Digambar Kamat And Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'कामतांचे वय झालंय, त्यांनी डोकं तपासून घ्यावं'; माजी मुख्यमंत्री - सरदेसाई यांच्यातील वाद शिगेला

Digambar Kamat Vs Vijai Sardesai: विजय सरदेसाईंचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, असे दिगंबर कामत मडगावच्या सभेत म्हणाले होते.

Pramod Yadav

देवाशी बोलणारे आमदार म्हणून चर्चेचा विषय ठरलेले दिगंबर कामत यांच्याशी आता देव पुन्हा बोलू लागलाय. आणि म्हणूनच त्यांना दुसऱ्यांना कोणती स्वप्ने पडतात, त्याचा साक्षात्कार होत असावा. असा टोमणा गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी मारला आहे.

विजय सरदेसाई हे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहे. त्यांचे हे स्वप्न म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' अशातला प्रकार आहे. असे वक्तव्य दिगंबर कामत यांनी केले आहे.

'जनता दरबार 'निमित्त विजय सरदेसाई आज (बुधवारी) डिचोलीत आले होते. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' या विधानावर प्रतिक्रिया देताना सरदेसाई यांनी कामत यांच्यावर निशाणा साधला. कामत यांचे आता वय झाले असून, त्यांनी आता स्वतःचे डोके तपासून घ्यावे, असेही ते म्हणाले.

सारे मंत्रिपदासाठी!

मंत्रिपद मिळाले नाही, तर पुढील विधानसभा निवडणूक कठीण जाणार असल्याची दिगंबर यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी माझ्याबाबतीत जे वक्तव्य केले आहे, ते केवळ मंत्रिपद मिळवण्यासाठी केले आहे. मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी दिगंबर कामत काहीही बरळू शकतात, अशी टीकाही विजय सरदेसाई यांनी केली.

भाजपच्या वतीने धन्यवाद मतदार, अभिनंदन मतदार हा कार्यक्रम मडगावात घेण्यात आला. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह दिगंबर कामतांनी भाषण केले.

व्यवस्थित व्यूहरचना आखली तर २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत २७ पेक्षा जास्त जागा जिंकणे शक्य आहे, असे प्रतिपादन सावंत यांनी या सभेत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT