Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : सत्तरीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

सत्तरीत भाजपचीच सरशी, सर्व पंचायतींवर राणे यांचे वर्चस्व

दैनिक गोमन्तक

वाळपई : भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्या योजना राबविल्या आहेत. यामुळे सत्तरी तालुक्यातील जनतेने प्रभावित होऊन भाजपाला पंचायत निवडणुकीत यश प्राप्त करून दिले आहे. सर्व पंचायतीवर भाजपाचा ध्वज फडकवला आहे. सत्तरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पंच सदस्यांनी एकत्र येऊन चांगले कार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई येथील आपल्या कार्यालयात नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की भाजपची कार्यपद्धती ही सर्वसामान्यांना पुढे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सत्तरी तालुक्यामध्ये भाजपाला घवघवीत यश प्राप्त झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे, असेही ते म्हणाले.

सत्तरी तालुक्यातील सर्व नवनिर्वाचीत पंच, सरपंच, उपसरपंचांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या व आमदार या नात्याने आपण व पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे या प्रत्येक पंच सदस्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. पंचायतीच्या राजकारणाच्या माध्यमातून कुणावरही वैरत्वाची भावना न ठेवता प्रत्येकाशी सहकार्याच्या माध्यमातून कार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

‘सर्वसामान्यांची फरफट होऊ देऊ नका’

नवनिर्वाचित पंच सदस्यांनी सर्वसामान्यांची कोणत्याही प्रकारे फरफट होणार नाही याची विशेष दखल घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कार्यामुळे आज भाजपाला देशात चांगले यश प्राप्त होत आहे. सत्तरी तालुक्यात प्राप्त झालेले यश हे त्यांच्या चांगल्या कार्यामुळे व गोव्यामध्ये भाजपा करीत असलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT