Dabolim Well Issue Dainik Gomantak
गोवा

Vasco: एक हजार नागरिक भीतीच्या छायेत

Vasco: श्‍वान पथकाचा अंदाज चुकला : बाराव्या दिवशीही परिसरात वास, प्रशासन हतबल

दैनिक गोमन्तक

Vasco: बारा दिवस उलटूनही दाबोळी-चिखली-व्हडलेभाट परिसरातील इंधन गळतीचा शोध लागलेला नाही. व्हडलेभाट परिसरातील सर्व विहिरींत, नाल्यात अजूनही पेट्रोल-डिझेलमिश्रित साठा आढळत आहे.

मुरगाव बंदर ते आल्त दाबोळी-सांकवाळ पठारावर भूमिगत मार्गे नेलेल्या इंधन वाहिनीला लागलेल्या गळतीची तपासणी करण्यासाठी मुंबई-दिल्ली येथून तांत्रिक अभियंत्यांना पाचारण करण्यात आले होते. पण त्यांना इंधन गळती शोधण्यास अपयश आले. यामुळे येथील 85 घरांतील 1 हजार नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.

कंपनीने चक्क लाखो रुपये खर्चून पंजाबमधून इंधन गळती शोधणारे स्निफर श्वान आणले. त्या श्वानाने तीन ठिकाणी भूमिगत इंधन वाहिनीला गळती लागल्याचे दाखविले आहे. परंतु खोदकाम केले असता तेथेही कंपनीच्या पदरी निराशाच आली.

मिरज, देसूर डेपोंमधून इंधन

1 इंधन पुरवठ्यात अडथळे आल्याचे इंधन विक्रेत्यांनी मान्य केले आहे; परंतु महाराष्ट्र, कर्नाटकमधील डेपोमधील टँकर सेवेत दाखल झाल्याने कमतरता नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

2 पेट्रोल पंप ओनर्सचे माजी अध्यक्ष परेश जोशी म्हणाले की, इंधन पुरवठा नेटवर्कमध्ये अडथळे आले असतील; परंतु इंधनाची कमतरता नाही.

3 राज्य सरकारने गोव्यातील आमच्या स्थानकांची पूर्तता करणाऱ्या झुआरी आयएव्ही लिमिटेड डेपोला मुख्य इंधन पाइपलाइनसह पंप ठेवण्यास सांगितले आहे, असे जोशी म्हणाले.

4 तेल कंपन्यांनी मिरज, देसूर आणि इतर डेपोतून टँकर आणले आहेत. यामुळे येथील वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT