Ethanol  Dainik Gomantak
गोवा

Ethanol : इथेनॉलच भविष्यातील इंधनाची आत्मनिर्भरता

आशुतोष सिंग : ऊस, मका आणि तांदूळ या धान्यांचा वापर, गोव्यातही लवकरच उत्पादन होणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सध्या मोठ्या खर्चांपैकी इंधनावरील खर्चाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भरता आणण्यासाठी ऊस, मका आणि तांदूळ या धान्यांपासून इथेनॉल (Ethanol) बनवण्याचे केंद्र सरकारची योजना असून इथेनॉल हीच भविष्यातील इंधनाची आत्मनिर्भरता असणार आहे असे मत री ग्रीन एक्सेल चे संचालक आशुतोष सिंग (Ashutosh Singh) यांनी ''गोमन्तक''शी व्यक्त केले आहे.

कोळसा, गॅस आणि इतर इंधनांना इथेनॉल हा सर्वात चांगला आणि कमी खर्चाचा पर्याय आहे. ब्राझील आणि अमेरिकेने (Brazil, America) या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून त्यांच्या देशातील बहुतांश वाहने ही पूर्णता इथेनॉलवर चालतात. आपल्याकडील परिस्थिती मात्र पूर्णतः वेगळी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वाहनांना लागणाऱ्या इंधनांमध्ये १५ ते २० टक्के इथेनॉल मिक्स केले जाऊ शकते. मात्र या २० टक्क्याचा पल्ला गाठण्यासाठी देशातील सध्याचे इथेनॉलचे उत्पादन ५०० वरून १५०० टनांपर्यंत उत्पादन वाढवावे लागेल.

केंद्र सरकारच्या पायघड्या

देशात इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प निर्माण व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडून अशा प्रकल्पांसाठी जमीन, पाणी, वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय आठवडाभरामध्ये पर्यावरण परवाने ही दिले जात आहेत.

बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या इंधनाला इथेनॉल हा एकमेव पर्याय आहे. सध्या देशभरात १४० प्रकल्प कार्यरत आहेत.पैकी ऊसपासून ( साखर) इथेनॉल बनवणारे जास्त आहे.केंद्र सरकारच्या नव्या नितीप्रमाणे २०२५ पर्यंत इथेनॉलचे उत्पादन तिप्पट म्हणजे १५०० टनापर्यंत नेले जाणार आहे.

संजीवनीमध्ये होणार ‘इथेनॉल’

संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये आता साखर ऐवजी इथेनॉलला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यासाठी लागणारे इथेनॉल गोव्यातच निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT