Vote  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: शिवोली - कळंगुटातही उत्साही मतदान!

प्रभाग 9 मध्ये गुरुवारी फेर मतदान

दैनिक गोमन्तक

कळंगुट: राज्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकीसाठी बार्दैशातील इतर गावांप्रमाणेच शिवोली तसेच कळंगुट पंचायतींच्या विविध प्रभागांसाठी उत्स्फूर्त मतदान झाल्याची माहिती मिळाली असून अनेक माजी सरपंच तसेच पंच सदस्यांनी आपणच पुन्हां निवडून येणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.

(Enthusiastic voting in siolim and calangut)

दरम्यान, कळंगुट पंचायतीतच्या सावतांवाडा येथील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान छपाईत आढळलेल्या महत्वाच्या चुकांमुळे स्थगित ठेवण्यात आले परंतु येथील प्रभागात गुरुवारी सकाळी पुन्हां मतदान घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान,गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत आजच्या सारखा जोश दिसणार नसल्याची खंत माजी सरपंच शॉन मार्टीन्स यांच्यासहित रिंगणात उभ्या ठाकलेल्या अनेक उमेदवारांनी दै.गोमंतकशी बोलतांना व्यक्त केली त्यामुळे. दरम्यान,कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी नजरचुकीने अशा चुका अनेकदां होत असतात त्यामुळे याबाबतीत कुणालाही दोषी न धरतां गुरुवारच्या फेर-निवडणूकीत पुन्हां एकदां दमदार मतदान होण्यासाठी मतदारांनी सज्ज राहाण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT