Goa Transport Minister Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

गोव्यात चार दिवसांत सात जणांचा अपघाती मृत्यू; वाहतूक मंत्र्यांनी Engineer's वर फोडले खापर

Goa Accident: खुद्द वाहतूक मंत्र्यांनी त्यावर भाष्य केल्याने बांधकाम खात्यातील अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Pramod Yadav

Goa Accident

पणजी: ऐन गणेश चतुर्थीच्या काळात खड्डेमय रस्ते आणि अपघात बळींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंना अभियंत्यांना जबाबदार धरले आहे.

असे मृत्यू होणे भयंकर असून रस्त्यांच्या दुरवस्थेचे खापर पावसावर फोडणे अयोग्य आहे, अशी त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. राज्यात गेल्या चार दिवसांत ७ रस्ते अपघात बळी गेले आहेत.

त्यानंतर अनेक मुद्दे चर्चेला येत आहेत. पैकी रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय गंभीर बनला असून, खुद्द वाहतूक मंत्र्यांनी त्यावर भाष्य केल्याने बांधकाम खात्यातील अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली होती.

तेव्हा प्रधान मुख्य अभियंते अनुपस्थित होते, हा मुद्दाही गुदिन्हो यांनी अधोरेखित केला आहे. चार दिवसांत मांद्रे येथील अपघातात ३, विर्नोड्यात १, डिचोली अपघातात २ व सांकवाळ येथे स्कूटर व बस अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. (Goa Accident Deaths)

दाबोळीवरुन मोपाला का जातायेत फ्लाईंट्स?

दाबोळी विमानतळावरुन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला फ्लाईट्स का पसंती देतायेत याबाबत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी मत व्यक्त केले. मोपा येथील जीएमआर कंपनी प्रभाव आणि दबाव तंत्र वापरत असून, फ्लाईट्स वळविण्याचा प्रयत्न करत आहे.

गोवा सरकारने विमानतळात गुंतवणूक केली आहे, सरकारला दोन्ही विमानतळ कार्यान्वित हवीयेत जीएमआर कंपनीने हे विसरता कामा नये. अनेक फ्लाईट्स दाबोळीवर परत येत आहेत, असे माविन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT