Panaji Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Panaji Hit And Run Case: जवळ आले होते बहिणीचे लग्न, त्यापूर्वीच भावाचा पणजीत 'हिट ॲण्ड रन' प्रकरणात मृ्त्यू

मनोजच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

Panaji Hit And Run Case: राज्याची राजधानी पणजीत शनिवारी पहाटे हिट ॲण्ड रन प्रकरण घडले असून, यात केरळ येथील अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. मेरशी सर्कल हिरा पेट्रोल पंपाजवळ शनिवारी पहाटे तीनच्या सुमारस ही घटना घडली.

मनोज नटराजन शशीधरन (वय 39, रा. मेरशी, मूळ केरळ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. मनोजच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज शशीधरन याला राष्ट्रीय महामार्गावर मेरशी सर्कल जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत शशीधरन गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याला 108 रूग्णवाहिकेद्वारे गोमकॉत दाखल करण्यात आले मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.

जवळ आले होते बहिणीचे लग्न

मृत मनोज शशीधरन मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचे वडील बांधकाम कंत्राटदार आहेत. दरम्यान, शशीधरन याच्या बहिणीचे 30 एप्रिल रोजी लग्न असून, लग्नाच्या तयारीत तो गुंतला होता. त्याचे आई-वडील देखील याचसाठी मूळ गावी (केरळ) येथे गेले होते.

अपघात की घातपात

मनोज त्याची सर्व वाहने घरी ठेऊन एवढ्या रात्री मेरशी येथे कसा आणि का पोहोचला? त्यामुळे त्याच्या घरच्यांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 279, 304 अ व मोटार वाहन कायदा कलम 134 (अ) (ब) अंतर्गत अज्ञात कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही बंद

पहाटेच्यावेळी झालेल्या या अपघाताची माहिती या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने मिळवण्यात अडचण येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT