Morjim Ajoba Devasthan Dainik Gomantak
गोवा

Ashwem Mandrem Ajoba Devasthan: अखेर तीन वर्षांच्या संघर्षाला यश! आजोबा देवस्थान मंदिराच्या जमिनीचा वाद मिटला

2024 चौरस मीटर जागा मंदिराला केली दान

Akshay Nirmale

Ashwem Mandrem Ajoba Devasthan Land Issue: उत्तर गोव्यातील आश्वे-मांद्रे येथील श्री आजोबा देवस्थान मंदिराच्या जमिनीचा वाद गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. त्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या जमिनीचे मालक आणि खरेदीदार यांनी 2024 चौरस मीटर जागा देवस्थानला दान केली आहे.

मूळ मालकाने जेव्हा ही जमिन विकली तेव्हा या जमिनीमध्ये या मंदिराचाही समावेश होता. देवस्थान समितीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी या विरोधात संघर्ष करायला सुरवात केली होती.

याबाबत मत व्यक्त करताना ग्रामस्थांनी म्हटले आहे की, तीन वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. तीन वर्षे या जमिनीसाठी झगडत आहोत. तीन वर्षांपुर्वी ही जमिन विकली गेली होती. त्यात मंदिरदेखील होते. पण संपुर्ण गावकऱ्यांनी या विरोधात लढा दिला. आज त्याचे फळ मिळाले आहे.

या जमिनीच्या खरेदीचा जेव्हा व्यवहार झाला होता तेव्हा त्या खरेदीखतात या मंदिराचाही समावेश होता. पण हे मंदीर हे गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता. त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने संबंधित खरेदीदाराकडे देवस्थानला ही जमिन देण्याबाबत मागणी केली होती.

त्यावर बोलणी सुरू होती. या जमिनीच्या मालकाने मंदिराची 2024 चौरस मीटर जमीन मंदिरासाठी दान केली आहे. त्याची सरकार दफ्तरी पुढील नोंदणी पुढील महिन्याभरात करण्यात येणार आहे. देवस्थान समितीने हा विषय लावून धरला आणि ही जमिन देवस्थानच्या ताब्यात घेतली.

जमिन विकणारे आणि विकत घेणाऱ्या अशा दोघांनीही मंदिर समितीसमोर ही जमिन देवस्थानला दान देत असल्याचे सांगितले. तसा मसुदा त्यांनी समितीकडे सुपूर्द केला. त्यामुळे हा प्रश्न आता मिटल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT