Atikraman Daink Gomantak
गोवा

मडगावातील वॉकिंग ट्रॅक’वर अतिक्रमण

फळ विक्रेत्यांसह फुलझाडे विक्री करणाऱ्यांनी माल ठेवून अतिक्रमण

दैनिक गोमन्तक

फातोर्डा (Fatorda): मडगाव परिसरात पदपथावर विक्रेत्यांचे बेकायदेशीरपणे अतिक्रमण नित्याचे झाले आहे. आता त्याही पलीकडे जाऊन अजूनपर्यंत उद्‍घाटन न झालेल्या आके येथील वॉकिंग ट्रॅकवर या विक्रेत्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत.मडगाव नगरपालिका अधूनमधून या पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई करीत असते. याबरोबरच नगरपालिकेचे फिरते कारवाई पथक पदपथावर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करीत असते.

मात्र, नव्याने बांदकाम केलेल्या आणि उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या ‘वॉकींग ट्रॅक’वर झालेले अतिक्रमण नगरपालिकेच्या फिरत्या कारवाई पथकाला दृष्टीस पडत नाही का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या ‘वॉकिंग ट्रॅक’वर फळ विक्रेत्यांसह फुलझाडे विक्री करणाऱ्यांनीही आपला माल ठेवून अतिक्रमण केले आहे. हा ‘वॉकिंग ट्रॅक’ आके येथील अग्निशमन दल कार्यालयाच्या पाठीमागून पॉवर हाऊसपर्यंत जाणाऱ्या बाह्य रस्त्याच्या समांतर नव्याने बांधण्यात आला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT