Encroachment on the side of the Mormugao Council building Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipal Council: मुरगाव पालिका इमारतीच्या बाजूने अतिक्रमण करत केले गटाराचे काम; वाहनचालक त्रस्त

मुरगाव पालिका कार्यालयीन इमारतीच्या मागील बाजूस जीसुडाने गटाराचे बांधकाम केले आहे

दैनिक गोमन्तक

Mormugao Municipal Council: मुरगाव पालिका कार्यालयीन इमारतीच्या मागील बाजूस जीसुडाने गटाराचे बांधकाम केले आहे. यामुळे काही ठिकाणी पदपथापासून दोन मीटरपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

दुचाकी उभ्या करण्यात येत होत्या, तेथे गटार बांधण्यात येत असल्याने भविष्यात दुचाकी कोठे उभ्या केल्या जातील हे स्पष्ट होऊ शकले नाही. पूर्वीच्या गटाराची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची गरज असताना सदर गटारापासून दोन मीटर अंतरावर नवीन गटार बांधण्यामागील प्रयोजन काय? असा प्रश्न वास्कोवासीय विचारत आहेत.

मुरगाव पालिका इमारतीचे कार्यालयीन नूतनीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. म्युनिसिपल हायस्कूलचे नूतनीकरण काम पूर्ण झाल्याने तेथे पुन्हा वर्ग सुरू झाले आहेत. इतर कामही पूर्ण झाले असल्याने लवकरच तेथे पूर्ववत कार्यालयीन कामकाज सुरू होईल.

इमारतीचे नूतनीकरण करताना काही बदल करण्यात आले आहेत. त्या बदलाचे नागरिकांनी सध्या तरी स्वागत केले आहे. तथापी मुरगाव पालिका इमारतीच्या सभोवती असणाऱ्या गटाराचे बांधकाम करताना सुडाने अफलातून डोके लढविल्याने नागरिक आश्र्चर्यचकीत झाले आहेत.

या इमारतीभोवती पोर्तुगीजकालीन गटार आहे. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा सहजपणे निचरा होतो. सध्या सुडाने सभोवती गटार बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या इमारतीच्या मागील भागात असलेल्या गटाराचे बांधकाम करताना पूर्वीच्या गटाराच्या ठिकाणी न करता रस्त्यावर सुमारे दोन मीटर अतिक्रमण करण्यात येऊन नवीन गटार बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. या ठिकाणी दुचाकी उभ्या करण्यात येतात. त्यासंबंधी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

गटारावर लाद्या घालण्यात आल्यास इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची भीती आहे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वस्त यांनी आवाज उठविताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी संबंधितांनी योग्य स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT