Encroachment in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Encroachment in Bicholim: डिचोलीतील रस्त्यांवर विक्रेत्यांचे अतिक्रमण; वाहनचालकांना अपघातांची भीती

रुंदीकरण कोणासाठी? : वाहनचालकांना प्रश्न

दैनिक गोमन्तक

राज्य महामार्गाअंतर्गत डिचोलीत रस्तारुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र वाठादेव-सर्वण परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर सध्या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. वाहतूक सुरक्षित व्हावी आणि रस्त्यावरील अपघात टाळता यावेत, या उद्धेशाने रस्त्याचे रुंदीकरण केले असले तरी विक्रेत्यांचे अतिक्रमण पाहता रुंदीकरण नेमके कोणासाठी? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

आधीच काही भागात वाहतुकीसाठी रस्ते असुरक्षित बनले आहेत. लहान-सहान अपघातही घडत आहेत. असे असतानाही विक्रेत्यांच्या रस्त्यांवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. व्हाळशी ते वाठादेवपर्यंतच्या साधारण पाच किलोमीटर बगलमार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. वाठादेव येथे बगलमार्गाला जोडून कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्वणपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण कामही जोरात सुरु आहे.

मात्र, वाठादेव येथील झांट्ये महाविद्यालय परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर सध्या मासे आणि अन्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. संध्याकाळच्या वेळी तर या रस्त्यावर विक्रेते बेधडकपणे बसतात.

वाहनचालकांकडून अपघाताची भीती

रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर मासळीविक्रेत्‍यांसमवेत अन्‍य विक्रेते बसतात. त्यांच्याकडून मासे आणि अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकही गर्दी करीत असतात. अनावधनाने रात्रीच्या वेळी वाहनाला बाजू देताना एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. स्थानिक पंचायत किंवा संबंधित सरकारी यंत्रणेने या विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT