Morjim  Dainik Gomantaक
गोवा

मोरजीतील अतिक्रमणाने वाहतूक कोंडी वाढली

बांधकामे, दुकाने, स्टॉल्स, संरक्षक भिंतींमुळे वाहतूक कोंडी

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण करून लहान-मोठी बांधकामे, दुकाने, स्टॉल्स, दगडी कुंपणे उभारली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

(Encroachment at Morjim increased traffic jam)

हल्लीच वरचावाडा येथे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात साहित्य बांधकाम साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. अशा प्रकारच्या लहान-मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दिलीप सावंत यांनी मोरजी पंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाला दिले आहे.

रस्ते रुंद झाले तरच गावाचा विकास होतो. मात्र, गावातील रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद केले जातात. याकडे पंचायतीसह सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

साबांखाकडे मनुष्यबळाचा अभाव

रस्ता रुंदीकरणासाठी सरकारने जमीन संपादित करून साबांखाच्या ताब्यात दिली. त्या अर्थी साबांखाने त्याकडे लक्ष देऊन आपल्या मालकीच्या जागेत कुणी अतिक्रमण करतो का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, साबांखाला कार्यालयीन कामकाज करण्यासाठी कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्याने अनेक कामे अडकून पडतात, तर मग रस्त्यावरील अतिक्रमणांवर साबांखा लक्ष कसे देणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

देखरेखीसाठी खास पथकाची गरज

पेडणे तालुक्यात साबांखाकडे 360 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या बाजूला कुणी अतिक्रमण करून बांधकामे करतो काय, यावर लक्ष ठेवण्यासाठी खास पथक नेमण्याची गरज आहे. तालुक्यात एकूण पाच एमडीआर रस्ते आहेत. त्या रस्त्यांसाठी आवश्यक असलेली जमीन सरकारने संपादित केली आहे. काही ठिकाणी स्थानिक व जमीनदाराच्या सहकार्याने रस्ता रुंदीकरण केले आहे.

गावडेवाडा रस्त्यावर कवाथे

मुख्य रस्ता ते गावडेवाडा हा किनारी भागात जाणारा रस्ता रुंद करण्यासाठी पुरेशी जागा जमीनदारांनी, तसेच शेतकऱ्यांनी दिली. दीड वर्षापूर्वी जमीनदार समीर लाड यांनी संबंधित जमीनमालकांशी चर्चा करून आणि स्वत: पदरमोड करून रस्ता रुंद केला. आता या रुंद केलेल्या रस्त्याच्या मधोमध कवाथे लावल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मोरजी विकास समितीच्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT