Medical Hospital  Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College : ‘गोमेकॉ’ प्रवेशद्वारावर अतिक्रमण; विक्रेत्यांची मनमानी

Medical Hospital : वाहतूक कोंडी, सुरक्षारक्षकांची बघ्याची भूमिका

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Medical College :

पणजी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर तसेच आजूबाजूला भाजी-फळ विक्रेते व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असले, तरी याकडे कोणाचेच लक्ष नाही.त्यामुळे पुन्हा सकाळच्यावेळी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार पुन्हा सर्रास सुरू आहेत.

सांताक्रुझ पंचायत तसेच गस्तीवरील पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. पंचायतीला व पोलिसांचा आशीर्वाद असल्यानेच हे विक्रेते बिनदिक्कतपणे व्यापार करत आहेत. या ठिकाणी इस्पितळाचे सुरक्षारक्षक असूनही ते फक्त बघ्याची भूमिका बजावत आहे.

गोमेकॉमध्ये दरदिवशी मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणीसाठी गर्दी होत असते. या इस्पितळाच्या प्रवेशद्वार तसेच आजूबाजूला अतिक्रमण केलेल्या काही व्यापाऱ्यांना तेथून हटवून काही अंतरावर गाळे बांधून देण्यात आलेले आहेत, तेथे त्यांची स्थलांतर केले आहे. या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी काहीजण टेबल्स घालून पॅकबंद अन्नपदार्थाची विक्री करतात.

तेथे असलेल्या कठड्यावर भाजी विक्रेत्यांनी पुन्हा ठाण मांडले आहे. त्यामुळे भाजी खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीमुळे या प्रवेशद्वारावर रुग्णांची वर्दळ तसेच वाहनांची होणारी गर्दी यामुळे गोंधळ होत असतो. अनेकदा इस्पितळ व्यवस्थापनाने तेथून त्यांना हटविले, तरी ते काही दिवसांनी पुन्हा ही विक्री करत आहेत. या प्रवेशद्वाराच्या समोरच मारुती देवस्थान आहे.

बाजूने असलेल्या पदपथावर फळ व भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.

प्रवेशद्वाराच्या ठिकाणी चार रस्ते आहेत. भुयारी मार्गातून येणारा रस्ता तसेच इस्पितळाकडे जाणारा रस्ता यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी भाजी व फळे विकत घेण्यासाठी वाहने रस्त्याच्या बाजूलाच थांबवून खरेदी करतात.

पणजी - सांताक्रुझ या प्रवासी बसेसचाही थांबा आहे. या रस्त्याच्या समोरच रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपास आहे त्यामुळे त्यामधून इस्पितळात येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. अतिक्रमण केलेल्या फळ-भाजी विक्रेत्यांची माहिती सांताक्रुझ पंचायतीला माहिती देऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही.

सापत्न वागणूक का?

तीन वर्षापूर्वी प्रवेशद्वाराच्या आसपास रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी इस्पितळाच्या तक्रारीवरून तेथील व्यापाऱ्यांना हटविले होते. त्यांना प्रवेशद्वारापासून काही अंतरावर गाळे उभारून देण्यात आले आहेत. तेथे भाजी व फळ विक्रेत्यांना तसेच अन्नपदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र त्यानंतर कुडका येथील काही फळ व भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण करून प्रवेशद्वारावर ठाण मांडले आहे. कायदा सर्वांनाच समान आहे तर उपजिल्हाधिकारी तसेच सांताक्रुझ पंचायत व पोलिस ही सापत्नभावाची वागणूक का देत आहेत, असा प्रश्‍न गाळेधारकांनी केला आहे.

विक्रेत्यांना पोलिसांचा पाठिंबा?

गोमेकाॅ परिसर आगशी पोलिस स्थानकाच्या अधिकार कक्षेत पडतो. हे पोलिस स्थानक बरेच लांब असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पोलिस स्थानकाची गस्तीवरील वाहने (पीसीआर) क्वचितच फिरताना दिसते. त्यांना हटवण्यात येत नाही. त्यामुळे त्यामुळे पोलिसांचा या विक्रेत्यांना पाठिंबा असल्याची शंका काही गाळेधारकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: भाच्याला घरी सोडताना मामावर काळाचा घाला; शिवोलीत रेंट-अ-थारचा थरार, स्थानिक तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Today: ज्येष्ठ पूर्णिमा व्रताला बनतोय अत्यंत दुर्मिळ योग; शनिवारी 'या' राशींच्या पदरात पडणार सुखाचे क्षण, नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ संकेत!

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT