Holi 2024 Dainik Gomantak
गोवा

Holi 2024: सेंद्रीय होळींच्या रंगांना प्रोत्साहन द्या

Holi 2024: सेंद्रिय रंगांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त उपक्रम

दैनिक गोमन्तक

Holi 2024:

पर्यावरणीय समस्यांबाबत संवेदनशीलता दाखवत, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी ज्ञानप्रसारक मंडळाचे महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, आसगाव, गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने सेंद्रिय होळीच्या रंगांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविला आहे.

सेंद्रिय होळीच्या रंगांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून, महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी जीएसबीएसच्या पाळये (साखळी) गोवन केंद्रातील महिलांना पर्यावरण विभाग, गोवा सरकार आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय होळीचे रंग तयार करणे, पॅकेजिंग करणे आणि लेबल करणे यासाठी प्रशिक्षण दिले. या हरित उपक्रमासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानेही महाविद्यालयाशी हातमिळवणी केली.

महिला बचत गटाने 600 किलो सेंद्रिय रंग तयार केले असून त्याची विक्री केली जात आहे. प्रदूषण मंडळाने रंग प्रमाणित केले तर जैवविविधता मंडळाने पॅकेजिंगसाठी मदत केली.

महाविद्यालयाने गेल्या दोन वर्षांपासून सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती देताना प्राचार्य प्रा. प्रो. डी.बी. आरोलकर म्हणाले की, महाविद्यालयाच्या हरित उपक्रमाला मुख्य निवडणूक कार्यालयाने मान्यता दिल्याने शाश्वत विकासात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाविद्यालयाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना चालना मिळेल.

यावर्षी पाळी येथील गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या गोवन बहुप्रक्रिया केंद्रातील महिलांना मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय रंग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. राजेश पेडणेकर (प्रकल्प सल्लागार) आणि डॉ. प्रभात देसाई (प्रकल्प संचालक) यांच्यासह इतर प्राध्यापक सदस्य डॉ. उमेश गावस,

डॉ. सिंथिया गवंडी, डॉ. वृता कडकडे, डॉ. अभिजित शेटगावकर, डॉ. राम गावस आणि डॉ. सुदेश मोरजकर यांनी महिलांना रंगांची निर्मिती, त्याचे लेबलिंग आणि पॅकेजिंग याबाबत मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT