Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government job: कर्मचारी भरतीचा निकाल 24 तासांत

Goa Government job: आयोगाचे पाऊल: 948 जणांचे प्रगतिपुस्तक संकेतस्थळावर

दैनिक गोमन्तक

Goa Government Job:

राज्य कर्मचारी भरती आयोगाने 30 जागा भरण्यासाठी काल घेतलेल्या संगणकावर आधारीत परीक्षेचा निकाल 24 तासांत जाहीर करत या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना धक्का दिला आहे. सरकारी कर्मचारी भरती महिनोंमहिने रखडण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची माहितीही आयोगाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करत पारदर्शीपणाचा नमुनाच सादर केला आहे.

आयोगाचे सदस्य दौलत हवालदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फातोर्डा येथील डॉन बॉस्को आणि आसगाव येथील आग्नेल संस्थेत ही परीक्षा घेतली. परीक्षेनंतर लगेच उमेदवारांना निकाल कळवण्यात आला. आज संकेतस्थळावर विषयनिहाय निकाल जाहीर केला आहे.

अर्ज केलेल्यांपैकी 77 टक्के जणांनी परीक्षा दिली. हे प्रमाण उत्तम आहे. सर्वसाधारणपणे अर्ज केलेल्यांपैकी 65 टक्के जण परीक्षेला येतात. पारदर्शी पद्धतीने निकाल जाहीर केला जाण्यातून सरकारी सेवेतील निवड गुणवत्तेच्याआधारे केली जाते हा विश्वास युवा वर्गात निर्माण होईल.

याशिवाय चांगले मनुष्यबळ राज्य प्रशासनासाठी उपलब्ध होईल. संवर्धन सहायक (१ जागा), साहाय्यक उपनिरीक्षक वायरलेस ऑपरेटर (१ जागा), लाईट हाउस किपर (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा),

टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स व फिजिक्स (३ जागा), माध्यमिक विद्यालयांसाठी चित्रकला शिक्षक (७ जागा), ग्रंथपाल श्रेणी-१ (८ जागा) आणि ग्रंथपाल श्रेणी-२ (८ जागा) अशा ३० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ९८४ जण या पद भरती परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT