एल्विस गोम्स यांनी काँग्रेस पक्षामध्ये रितसर प्रवेश केला. Dainik Gomantak
गोवा

एल्विसने धरला काँग्रेसचा हात; ही दिलजमाई,की चिंता भविष्याची?

आम आदमी पक्षाचे मागील निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तथा राज्य निमंत्रक एल्विस गोम्स यांनी काल कॉंग्रेस पक्षामध्ये रितसर प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पक्षाचे (AAP) मागील निवडणुकीतील (Election) मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तथा राज्य निमंत्रक एल्विस गोम्स (Elvis Gomes) यांनी काल कॉंग्रेस (Congress) पक्षामध्ये रितसर प्रवेश केला. येथील कॉंग्रेस कार्यालयातील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar kamat) आणि प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी गोम्स यांचे स्वागत केले. यावेळी कुंकळ्ळीचे कॉंग्रेस नेते युरी आलेमाव (Yuri Alemao) तसेच प्रदेश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Elvis Gomes rejoined Goa Congress party)

यावेळी गोम्स म्हणाले, ‘गोवा फर्स्ट’ हे माझे घोषवाक्य असेल. ‘आप’ सोडून नऊ महिने झाल्यानंतर गोव्याच्या हितासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे 10 आमदार फुटले. त्यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपचे सरकार गोव्याचे अस्तित्व नष्ट करत आहे. तर ‘आप’ लोकांना खोटी आश्‍वासने देऊन लोकांची दिशाभूल करून मते मिळवू पाहात आहे, असा आरोप यावेळी गोम्स यांनी केला.

गोम्स हे गोवा राज्याचे उच्च श्रेणीचे प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या अनुभवाचा लाभ कॉंग्रेसला मिळणार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे, असे यावेळी कामत म्हणाले. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाच्या निर्णयानुसार काम करत राहीन. भाजपला सत्तेवरून हटवायचे आहे, असे युरी आलेमाव यावेळी म्हणाले.

‘आप’ची कुलंगडी बाहेर काढणार

‘आप’ ही भाजपची बी टीम आहे. गोम्स काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांना ‘आप’चा खरा चेहरा माहीत आहे. गोवाभर ‘आप’ची कुलंगडी बाहेर काढण्यासाठी गोम्सचा वापर काँग्रेस करणार आहे, अशी टीका चोडणकर यांनी यावेळी केली. येत्या काळात आप व इतर पक्षाचे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये येणार आहेत. मात्र, काँग्रेसच्या कुंकळ्ळीतील उमेदवारीबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

तो आवाज ट्रोजनचा नव्हेच!

काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्या आवाजातील एक ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गिरीश चोडणकर यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. याबाबत चोडणकर यांना विचारले असता. त्या ऑडियोतील आवाज ट्रोजनचा नव्हे, तो डब केलेला आहे. भाजपचे हे कारस्थान आहे, असा दावा चोडणकर यांनी केला. याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT