Alka Lamba And Elvis Gomes Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: एल्विस गोम्स यांनी घेतली काँग्रेसच्या अल्का लांबांची 'सदिच्छा भेट'

आमची ही सदिच्छा भेट होती असे सांगून गोम्स (Elvis Gomes) यांनी हा विषय मिटविण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात विधानसभा निवडणुक (Assembly Elections) सात महिन्यावर येऊन ठेपलेली असताना राजकीय हालचालींना वेग आला (Goa Politics) असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) प्रवेश करणार असे सांगितले गेलेले आपचे (AAP) पूर्वीचे राज्य निमंत्रक एल्विस गोम्स (Elvis Gomes) यांनी काल काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्त्या अल्का लांबा यांची भेट घेतल्याने परत राजकीय चर्चेला उत आला आहे. (Elvis Gomes meets Alka Lamb of Congress)

आमची ही सदिच्छा भेट होती असे सांगून गोम्स यांनी हा विषय मिटविण्याचा प्रयत्न केला असला तरी या बैठकीत गोम्स यांनी लवकरात लवकर काँग्रेस पक्षात सामील व्हावे अशी गळ त्यांनी घातल्याचे समजते.

एल्विस गोम्स यांच्या या भेटीने कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांच्या गोटात मात्र हलचल माजली आहे असे समजते. युरी आलेमाव याना सध्या कुंकळ्ळीत काँग्रेसचा उमेदवार म्हणून पाहिले जात असून जर गोम्स यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास तेही कुंकळ्ळीच्या उमेदवारीवर दावा करू शकतील.

मिळत असलेल्या माहितीनुसार गोम्स यांनी कुंकळ्ळी व्यतिरिक्त आणखी तीन मतदारसंघाचे पर्याय खुले ठेवले आहेत. गोम्स यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास त्यांना महत्वाचे पदही देण्यात येणार असे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT