Konkan Railways Dainik Gomantak
गोवा

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण

कोकण रेल्वे प्रकल्‍पाच्‍या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: महाराष्‍ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्‍पाच्‍या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत या मार्गावरून विजेवर रेल्‍वे धावणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विट करून दिली आहे. रोहा ते ठोकूरदरम्यान 764 किलोमीटरचा रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर कारवार, बंगळूर, रत्नागिरी ते दादर अशी रेल्वेस्थानके आहेत. या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेची सुरुवात करण्यात आली आहे.

गोव्यातील थिवी ते रत्नागिरी आणि थिवी ते मडगाव रेलमार्गाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा आणि अन्य अधिकाऱ्यांनी केली आणि या रेल्वे रेल्‍वेला हिरवा कंदील दाखविला आहे.या प्रकल्पाची पायाभरणी 2015 मध्ये करण्यात आली होती. याचा एकूण खर्च 1287 कोटी रूपये एवढा आहे. या प्रकल्पाचे काम सहा टप्‍प्यांमध्ये करण्यात आले असून आठ वर्षांनंतर मार्च 2022 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. विजेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे दरवर्षी इंधनाचे 150 कोटी रुपये वाचतील. हा प्रकल्प प्रदूषणमुक्त असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT