Electricity line in Benaulim Dainik Gomantak
गोवा

बाणावलीत विद्युतभारित तारांमुळे धोका वाढला

बहुतांश तारा उघड्या असून विद्युतभारित असल्याने अपघाताची भीती

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावजवळील बाणावलीमध्ये नागरिकांसमोर एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. विजेच्या खांबावरील विद्युतभारित तारांमुळे स्थानिकांचा जीव धोक्यात आला आहे. खांबावरील बहुतांश तारा या उघड्या असून विद्युतभारित असल्याने त्यांच्या संपर्कात आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बाणावलीमध्ये (Benaulim) अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवर विद्युतभारित तारांचा गुंता झाल्याचं चित्र आहे. या गुंतलेल्या उघड्या तारा घरांपासून अगदी जवळ असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या तारांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहेत. तसंच तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याचाही धोका असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विद्युतभारित उघड्या तारांसोबतच फोनच्या केबल, टीव्हीच्या (TV) केबल आणि अशा तारांचा गुंता झाल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती आहे. शॉर्टसर्किट झाल्यास आसपासच्या घरांना याचा मोठा धोका आहे. गोव्याच्या (Goa) मास्टरप्लाननुसार विजेच्या तारा या भूमिगत असाव्या असणं गरजेचं आहे. मात्र बाणावलीत मात्र या तारा उघड्या आणि विजेच्या खांबावर असल्याने धोका वाढला आहे. वीज खात्याने या तारांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT