Electricity and water issue in Chorao island Dainik Gomantak
गोवा

चोडण बेटावर दिवसाआड पाणीपुरवठा; लोकांचे हाल

पाणी साठवून ठेवण्यासाठी पंचायतीने पुढाकार घेण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : गेल्या काही वर्षांपासून चोडण बेटावरील पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. पाणी साठवून ठेवण्यासाठी पंचायतीकडे 300 चौमी जमिनीची पूर्तता अजूनही न झाल्याने चोडण गावात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो व तोसुद्धा अपुरा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाण्‍याबरोबरच चोडणवासीयांना विजेची समस्‍याही सतावत आहे. वीज नसेल तर पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पाणी खेचण्यासाठी बसविण्यात आलेले पंप फारच जुने झाल्याने त्‍यात आणखी भर पडत आहे, असे खात्याचे कनिष्ठ अभियंता अभिजीत नाईक यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी विजेच्या गडगडाटामुळे काराभाट येथील पॅपसेट जळाला. हा पॅपसेट जुना असल्याने दुरुस्तही होत नाही. शेवटी डिचोली तालुक्यातील खात्याकडे असलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.

सध्या चोडण बेटावर 6 जुने पंपसेट आहेत. नवीन पंपसेट बसविण्याची मान्यता आपण खात्याकडून घेतली आहे. यासाठी 8 लाख रूपये खर्च येणार आहे. त्‍यानंतर या सेवेत मोठी सुधारणा होऊ शकते, असे नाईक म्‍हणाले. तर, पाणी साठवून ठेवण्यासाठी पंचायतीने पुढाकार घेतल्‍यास पाण्याची समस्‍या मार्गी लागू शकते, असे एक ग्रामस्‍थ पुरुषोत्तम यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT