electrician dies in Sattari Goa Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

हेल्पर लाईनमन संजय गावकरच्या मृत्यूला जबाबदार कोण,असा प्रश्‍नही विचारला जात आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात शुक्रवारी कणकिरे गावात हेल्पर लाईनमन संजय गावकर यांचा विजेचा जोरदार झटका लागून निधन झाल्याची घटना घडल्यानंतर सत्तरी तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हेल्पर लाईनमन संजय गावकरच्या मृत्यूला जबाबदार कोण,असा प्रश्‍नही विचारला जात आहे. (electrician dies in Sattari Goa)

आता पावसाळा तोंडावर असून सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना अहोरात्र तैनात रहावे लागते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच कामाला जुंपावे,अशी मागणी होत आहे.

वास्तविक वीज तारांच्या दुरुस्तीवेळी काम करताना योग्य ती काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे असते. एखाद्या क्षेत्रात कर्मचाऱ्याला कामासाठी पाठविल्यानंतर तेथे देखरेखीची गरज असते. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतणारे प्रसंग घडतात. अशा घटना टाळण्यासाठी कोणती काळजी वा उपाययोजना सरकार हाती घेते याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

आज माझा भाऊ गेला. पण पुन्हा अशा घटनेत दुसऱ्या कुणाचाही भाऊ जाऊ नये, अशी विनवणी संजय गावकर यांच्या बहिणीने डोळ्यात अश्रू आणून वीज अधिकाऱ्यांशी बोलताना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT