Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगाव पालिकेतील वैधानिक समित्यांची एकमताने निवड

Goa News: मडगाव पालिका मंडळाची आज खास बैठक झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa News: मडगाव पालिका मंडळाची आज खास बैठक झाली. या बैठकीत स्थायी व विषय या दोन वैधानिक समित्यांची निवड एकमताने करण्यात आली. त्यामुळे निवडणूक झाल्यास जे क्लिष्ट नियम पाळावे लागले असते, ते टळले.

स्थायी समितीसाठी डॉ. रोनिता आजगावकर, स्वेता लोटलीकर, लता पेडणेकर, मिलाग्रीनो गोम्स, जोन्स फ्रान्सिस आग्नेल आणि निमिषा फालेरो यांची निवड करण्यात आली. वितोरिना तावारीस यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे फेटाळण्यात आला. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि उपनगराध्यक्ष दीपाली सावळ हे या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत.

विषय समितीसाठी चार सदस्यांची निवड करणे भाग होते. मात्र, पाच अर्ज आल्याने नगराध्यक्षांनी एक अर्ज मागे घेण्यास 15 मिनिटांचा अवधी दिला. तेराव्या मिनिटाला दामोदर वरक यांनी आपला अर्ज मागे घेतला.

किचकट कायदे सुटसुटीत करा!

पालिकेतील समिती निवडणूक प्रक्रियेसारखे किचकट कायदे सरकारने सुटसुटीत करावेत अशी मागणी नगरसेवक घन:श्याम शिरोडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. नगराध्यक्ष निवड प्रक्रिया हात दाखवून करण्यासारखे कायदे दुरुस्त करून आमदार कामत आपण यात किती माहीर आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यांनी इतर क्लिष्ट कायद्यांतही दुरुस्त्या आणाव्यात, असेही शिरोडकर म्हणाले.

सहा दिवसांत 15 लाखांची वसुली

नगरपालिकेला विविध मार्गांनी कित्येक कोटी रुपये येणे बाकी आहेत. गेल्या सहा दिवसांत 17 लाख रुपयांची वसुली केल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले. सुमारे 40 टक्के व्यापारी संकुलांकडे परवानाच नाही. त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

कचरा कंत्राटदाराला मुदतवाढ अयोग्य

नगरसेवक घन:श्याम शिरोडकर म्हणाले की, मडगावात कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ करून देणे योग्य नव्हे. जेव्हा पालिकेला त्याची मुदत तीन महिन्यांनी संपणार आहे, हे माहीत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी काहीच हालचाल केली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT