Panchayat Election in Goa Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकांचा चेंडू आता सरकारच्या ‘कोर्टात’

निवडणूक आयोगाचा न्यायालयात जाण्याचा सरकारला सल्ला

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालामुळे लांबलेल्या पंचायत निवडणुकांची टोलवाटोलवी अद्याप सुरूच आहे. या निवडणुकांचा घोळ कायम असून पावसाळ्यानंतर निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस करून राज्य सरकारने फाईल पाठवली. (Panchayat Election in Goa)

मात्र, निवडणुका घेणे आमचे आद्यकर्तव्य आहे. ओबीसी आरक्षणासाठी पंचायत निवडणुका घेणे थांबू शकत नाही. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकायच्या असतील, तर त्याला संबंधित न्यायालयाची संमती घ्या असे सांगत आयोगाने पंचायत निवडणुकांचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे.

निवडणुका घेण्याचे काम आयोगाचे असले तरी तारीख अधिसूचित करण्याचे अधिकार सरकारकडेच आहेत. त्यानुसार आयोगाने सरकारला तारीख निश्‍चित करून मसुदा पाठवला होता. त्यावर सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस केली आहे. याला आयोगाने नकार दिला असून निवडणूका पुढे ढकलायच्या असतील, तर त्याला न्यायालयाची संमती घ्यावी लागेल असे म्हणत राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT