Illegal Fishing in Goa Dainik Gomantak
गोवा

Fish In Goa: चणकचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न

Fish In Goa: मच्छीमार खाते सेंट इस्टेव्ह येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पात चणक मत्स्य उत्पादन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

Fish In Goa: मच्छीमार खाते सेंट इस्टेव्ह येथील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पात चणक मत्स्य उत्पादन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. चणक माशांच्या प्रजातीला गोव्यात जास्त मागणी आहे, त्यामुळे चणकच्या उत्पादनाचा लोकांना फायदा होऊ शकतो असे मत्स्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात अनेकांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेतला आहे. या अंतर्गत उद्योजक आणि लोकांना विविध प्रजातींची मत्स्यशेती करण्यास प्रोत्साहित केले जाते. या योजनेच्या लाभार्थ्यांना पिंजरे आणि बायोफ्लोक प्रदान केले जातात.

आतापर्यंत 42 हून अधिक नदी पिंजरे आणि बायोफ्लोक प्रदान केले आहेत कुडतरी, सेंट एस्टेव, आखाडा, गावंडळी, नावेली आणि चिंचोणे गावातील काही लोकांना मत्स्य विभागाकडून बायोफ्लॉक मिळाले आहे.

बायोफ्लॉक पुरवण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे माशांना खाद्य खर्च कमी करणे हे आहे, अशी माहिती मच्छीमार खात्यातील सुत्रांनी दिली. मत्स्यव्यवसाय विभागाने सेंट एस्टेव्ह येथील प्रकल्पात १० सेंटीमीटर चणक मासे सोडले आहेत. यात २ पिंजरे असून प्रत्येक पिंजऱ्यात ३०० चणक सोडली आहेत.

आम्ही या माशांचे मत्स्यपालन करत आहोत. पुढील ६ ते ७ महिन्यांत चणक मासे १ ते २ किलोग्रॅमपर्यंत वाढतील अशी अपेक्षा आहे.  ओल्ड गोवा फार्म येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे कर्मचारी या प्रकल्पाची देखरेख करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT