Efforts continue to increase chilli production at Khol
Efforts continue to increase chilli production at Khol 
गोवा

खोल येथील मिरची उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू

Dainik Gomantak

पणजी, 

भौगोलिक मानांकन मिळालेल्या खोल - काणकोण येथील मिरचीचे उत्पादन वाढावे यासाठी विज्ञान तंत्रज्ञान खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. या मिरचीवर त्या ठिकाणीच प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा राहू शकतो का अशी शक्यता खात्याचे संचालक लेविनसन मार्टिन्स यांच्‍या अध्यक्षतेखालील बैठकीत आजमावण्यात आली होती. त्यामुळे आता मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी राज्य विज्ञान व तंत्रज्ञान मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काणकोणचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्यात काजू फेणीनंतर मिरचीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. खोल परिसरातील माळरानावर पावसाळ्यात मिरचीचे पीक घेण्यात येते. गेली काही वर्षे हे उत्पादन घटत असल्याने दिसत आहे. कूळ कायद्यामुळे जमीन मालक कसण्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळेही मिरचीचे पीक घेण्यास अनेकजण इच्छूक असूनही त्यांना जमीन उपलब्ध होत नसल्याने मिरचीचे पीक घेता येत नाही. आता भौगोलिक मानांकन या मिरचीला मिळाले असल्याने कृषी खात्याने त्यांच्यासाठी खास योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या केपे मतदारसंघात खोल हा गाव येत असून कवळेकर यांच्याकडेच कृषी खात्याचा ताबा आहे.
उत्पादक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर वेळीप यांच्या म्हणण्‍यानुसार सरकारी मदत मिळाली, तर खोल येथे मिरचीचे पुरेसे उत्पादन करणे शक्य होणार आहे. मिरचीचे पीक घेण्यासाठी सरकारी प्रोत्साहनाची गरज आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT