Edwin Nunes Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat: चौकशी टाळण्याची तरकीब Edwin Nunes च्या अंगलट, आणखी एक गुन्हा दाखल

वादग्रस्त कर्लिसचा चालक एडविन नूनीस सध्या जामीनावर बाहेर आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देशभर गाजत असलेले भाजप नेत्या सोनाली फोगाट प्रकरणाचा (Sonali Phogat Case) तपास सध्या सीबीआय करत आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत असले तरी, इतर तीन आरोपी जामीनावर बाहेर आहेत. वादग्रस्त कर्लिसचा चालक एडविन नूनीस (Edwin Nunes) देखील सध्या जामीनावर आहे. पण, चौकशीतून पळवाट काढण्यासाठी नूनीसने लढलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. आपल्याला कोविड (Covid-19) झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्याच्यावर आणखी एक गुन्हा हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) दाखल केला आहे.

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कर्लिस क्लबचा चालक एडविन नूनीस याला देखील पोलिसांनी 27 ऑगस्टला अटक केली. हणजूण पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर 08 सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. नूनीस याची अंमली पदार्थ प्रकरणात चौकशी सुरू आहे. या चौकशीतून सूट मिळावी यासाठी नूनीसने आपल्याला कोविड झाला असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर केले. या प्रमाणपत्राची खातरजमा केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून नूनीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एडविन नूनीस, रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर सध्या जामीनावर बाहेर आहेत

सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कर्लिस भोवती फिरत आहे. याच ठिकाणी सोनाली फोगाट यांच्या मृत्यू संबधित महत्वाच्या घटना घडल्या. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून, पथक गोव्यात तळ ठोकून आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग अटकेत आहेत. तर, एडविन नूनीस, रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पण, एडविन नूनीसने चौकशी टाळण्यासाठी केलेली कारनाम्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT