Goa Special Child School Dainik Gomantak
गोवा

Goa Education institution: शिक्षण संस्‍थांनी अंगणवाड्या, बालवाड्या दत्तक घ्याव्यात

बालवाडी आणि अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया

दैनिक गोमन्तक

पणजी: बालवाडी आणि अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया आहे. हा पाया अधिक मजबूत व्‍हावा यासाठी मोठ्या शिक्षण संस्‍थांनी पुढे यावे, आणि आपल्‍या परिसरातील अंगणवाड्या किंवा बालवाड्या दत्तक घ्याव्‍यात, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

(Educational institutions in Goa should adopt Anganwadis, Kindergartens)

राज्‍यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी किमान एक अंगणवाडी दत्तक घ्यावी. या बालवाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्‍न करावेत, असे या परिपत्रकात म्‍हटले आहे. संस्था प्रमुखांनी संबंधित व्यवस्थापनांशी सल्लामसलत करून परिसरातील बालवड्यांची माहिती घेऊन दत्तक घेण्यासंबंधी शुक्रवार 5 ऑगस्टपर्यंत खात्‍याकडे माहिती सादर करावी, असे आवाहन या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

हे परिपत्रक ऐच्‍छिक असून मोठ्या शिक्षण संस्‍थांनी बालवाड्या किंवा अंगणवाड्या दत्तक घेतल्‍यास शिक्षणाचा पाया अधिक मजूबत होईल. केवळ माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांनीच नव्‍हे तर राज्यातील महाविद्यालयांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन आहे. दत्तक घेण्यासाठी कोणत्‍याही शिक्षण संस्‍था पुढे आल्‍यास त्‍यांचे स्‍वागत आहे. - शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

...अन्यथा वीज, पाण्यावर लागणार व्यावसायिक शुल्क

पोलिसांनी राज्‍यातील भाडेकरूंची माहिती वीज आणि साबांखाला द्यावी. वीज आणि पाण्याच्‍या जोडण्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असेल, तर अशा लोकांकडून व्यावसायिक दराने शुल्क आकारावे, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच सर्व खात्‍यांच्‍या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्‍यांनी हे निर्देश दिले.

केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या अनेक सामाजिक योजना आहेत. त्‍या तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. अनेक लोकांना सरकारी योजनाच माहीत नसते. यासाठी प्रत्‍येक खाते प्रमुखांनी आपल्‍या खात्‍यात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT