ED Investigation on Job Scam in Goa Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam : छुपे चेहरे समोर येणार? नोकरी घोटाळा प्रकरणात EDची चौकशी सुरु; केस फाइल्सची मागणी

ED Investigation on Job Scam in Goa: गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या ईडीचा कसून तपास सुरु झालाय

Akshata Chhatre

Panaji News: गोव्यात थैमान घालत असलेल्या नोकरी घोटाळा प्रकरणात आता ईडीने लक्ष घातले असून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या अंतर्गत गोव्यात तपासाला सुरुवात झाली आहे. नोकरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीने अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल तयार केला आहे.

आत्तापर्यंत सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात गोवा पोलिसांनी ३३ गुन्हे दाखल केले असून यांपैकी २० गुन्ह्यांची उत्तर गोवा तर बाकी १३ गुन्ह्यांची नोंद दक्षिण गोव्यातून झाली आहे. गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या ईडीचा कसून तपास सुरु झालाय.

गोव्यात वर्ष २०१४-१५ पासून पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे फसवे प्रकार सुरु आहेत, यामध्ये आतपर्यंत महिलांचा सक्रिय सहभाग आढळून आला असून म्हार्दोळ पोलीस स्थानकात ऑक्टोबर महिन्यात पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती.

पूजा नाईकच्या घोटाळ्यानंतर दीपश्री गावास, प्रिया यादव, श्रुती प्रभुगावकर, उमा पाटील यांच्याविरोधात गोव्याच्या विविध भागांमधून गुन्हे दाखल करण्यात आलेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत गोव्यातील जवळपास ३०० पेक्षा अधिकांना सरकारी नोकरी प्रकरणाचे अमिश दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालयात आलाय. गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, वाहतूक, महसूल, पोलीस आणि आरोग्य अशा विविध विभागांमध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून डिचोली, बार्देझ, काणकोण,फोंडा तालुक्यांमधून आरोपींना हुडकून काढण्यात आलंय. पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवण्याच्या नादात अनेक सामान्य लोकंना चुना लागलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT