उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या त्यांच्या गोवा (Goa), मुंबई, नवी दिल्ली, पुणे येथील मालमत्तेवर ईडीचे छापे Dainik Gomantak
गोवा

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गोव्यातील मालमत्तेवर ईडीचे छापे

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांना या मालमत्ता कायदेशीररित्या त्यांच्या मालकीच्या आहेत. बेकायदेशीर पैशाने खरेदी केल्या नाहीत हे सिद्ध करण्यासाठी 90 दिवस देण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची (Property) झडती घेतल्यानंतर, आयकर अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्यांच्या गोवा (Goa), मुंबई, नवी दिल्ली, पुणे येथील मालमत्ता आणि 24 हून अधिक जमिनी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे 1400 कोटी रुपयांची ही संपत्ती आहे. आयकर विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय (ED) 1988 सालच्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेत्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित विविध मालमत्तांबाबत तात्पुरते संलग्नक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांना या मालमत्ता कायदेशीररित्या त्यांच्या मालकीच्या आहेत. बेकायदेशीर पैशाने खरेदी केल्या नाहीत हे सिद्ध करण्यासाठी 90 दिवस देण्यात आले आहेत. चौकशी प्रलंबित असताना ते या मालमत्ता विकू शकत नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

या मालमत्तांमध्ये साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, ज्याची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. गोव्यातील निलय नावाचे 250 कोटींचे रिसॉर्ट, दक्षिण मुंबईतील निर्मल हाऊस येथील पार्थ पवार यांचे कार्यालय जे सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचे आहे. दक्षिण दिल्लीत फ्लॅट आणि राज्यभरात 24 हून अधिक ठिकाणी असलेली जमीन ज्याचे एकत्रित बाजार मूल्य 1400 कोटी आहे. उल्लेखनीय म्हणजे, 750 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेला सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचीही चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT