ED Raid Dainik Gomantak
गोवा

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

ED Raids Goa Delhi Karnal: महेश टिंबर प्रा. लि. या कंपनीशी संबंधित १५५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: महेश टिंबर प्रा. लि. या कंपनीशी संबंधित १५५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ‘ईडी’च्या चंदीगड विभागीय पथकाने कर्नाल, दिल्ली आणि गोव्यातील (Goa) ११ ठिकाणी छापे टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे जप्त केले आहेत. ही कारवाई ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२’अंतर्गत करण्यात आली आहे.

‘ईडी’च्या तपासात असे समोर आले, की महेश टिंबर प्रा. लि.ने भारत आणि सिंगापूरमधील काही व्यक्तींच्या संगनमताने कोणतीही प्रत्यक्ष लाकूड आयात न करता १९५.०२ कोटी रुपयांचे व्यवहार बनावट एफएलसीद्वारे केले. सीमा शुल्क विभागानेही बँकेत सादर केलेली अनेक ‘बिल्स ऑफ एंट्री’ आणि ‘बिल्स ऑफ लॅण्डिंग’ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात अशोककुमार मित्तल, रमण सिंघल आणि दीपक सिंगला यांच्यासह सौरभ धिंग्रा आणि भरत भूषण मित्तल यांची नावे समोर आली आहेत. त्यांनी कंपनीचे संचालक किंवा व्यवस्थापकीय पदावर असताना गुन्ह्यातून मिळालेली रक्कम वळविण्याचे काम केल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. छापेमारीदरम्यान सौरभ धिंग्रा याच्याशी संबंधित ठिकाणांहून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ‘ईडी’ आता या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा मार्ग शोधत असून, पुढील तपास सुरू आहे.

...अशी केली फसवणूक

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नवी दिल्ली येथील शाखेने संबंधित टिंबर फर्म, तिचे संचालक आणि इतर सहकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. बँक ऑफ ओरिएंटल कॉमर्स आणि त्यांच्या कन्सोर्टियम बँकांना सुमारे १५५.२१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बँकेच्या ‘फिनाकल’ सिस्टिममध्ये नोंद न करता, ‘स्वीफ्ट’ मेसेजमध्ये फेरफार करून परदेशी पतपत्रे अनधिकृतपणे वाढवून ही फसवणूक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT