Goa casino arrested gamblers Dainik Gomantak
गोवा

ED Raid: ‘ईडी’ची मोठी कारवाई! ‘बिग डॅडी’सह म्हापशातील छाप्यांत 4 कोटी जप्त, देशभरात 15 ठिकाणी धाड

Big Daddy Casino raid: ईडीच्या माहितीनुसार, या प्रकरणात वित्तीय गैरव्यवहार आणि परकीय चलन नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून पुढील चौकशी सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लि., वर्ल्डवाईड रिसॉर्टस् अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. तसेच बिग डॅडी कॅसिनो आणि म्हापसा मार्केटमधील ‘लोझा शामू’ या दुकानांवर छापा टाकून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ४ कोटींहून अधिक रोकड-मालमता जप्त करण्यात आली आहे.

परकीय चलन नियमन कायदा १९९९ (एफईएमए) अंतर्गत २८ व २९ सप्टेंबर रोजी ईडीने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून गोवा, दिल्ली-एनसीआर, मुंबई व राजकोट अशा एकूण १५ ठिकाणांवर छापे टाकले. या छापासत्रादरम्यान विविध संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल पुरावे, रक्कम व परदेशी चलन हस्तगत करण्यात आले.

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत सुमारे २.२५ कोटी इतकी भारतीय चलनातील रक्कम, सुमारे १४ हजार अमेरिकन डॉलर्स तसेच विविध परदेशी चलन मिळून ८.५० लाखांच्या आसपासची रक्कमेचा समावेश आहे. याशिवाय, तपासादरम्यान सुमारे ९० लाखांपेक्षा अधिक किमतीची विविध क्रिप्टोकरन्सी गोठविण्यात आली आहे.

ईडीच्या माहितीनुसार, या प्रकरणात वित्तीय गैरव्यवहार आणि परकीय चलन नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असून पुढील चौकशी सुरू आहे. पणजी विभागीय कार्यालयाने म्हापसा नगरपालिका मार्केटमधील ‘लोझा शामू’ या दुकानावर २६ सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. ही कारवाई गोवा विमानतळ सीमाशुल्क विभागाने सुमारे ३५,००० अमेरिकन डॉलर्सच्या परकीय चलन जप्तीबाबत दिलेल्या विशिष्ट माहितीनंतर करण्यात आली.

‘फॉरेक्स ट्रेडिंग’मध्ये ३ कोटींचा व्यवहार

म्हापशात जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीत दुकानमालक परवानगीशिवाय परकीय चलनाच्या व्यवहारात गुंतलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅट्स व संवादांवरून संबंधित बेकायदेशीर फॉरेक्स व्यवहारांची एकूण रक्कम ही २ ते ३ कोटी रुपये एवढी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT