Enforcement Directorate  Dainik Gomantak
गोवा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

ED Goa: सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडी तपासादरम्यान 10 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

Pramod Yadav

Enforcement Directorate

गोव्यातील विपुल शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स विपुल शिपिंग इंजिनीअरिंग वर्क्स या कंपन्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या कोची विभागीय कार्यालयाने कारवाई करत 12.20 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडी तपासादरम्यान 10 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. तसेच, कंपनीच्या संचालकांविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) गुन्हे दाखल करण्यात आलेत.

अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईत रोखे, आयात केलेली मशिनरी, बँक बॅलन्स, दोन लँडिंग बार्ज यासह जंगम आणि स्थावर अशा 12.20 कोटी किमतीच्या 39 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

लक्षद्वीपसाठी 200 प्रवासी क्षमतेचे बार्ज उभारणीचे काम विपुल शिपयार्डला देण्यात आले होते, मात्र यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत कंपनी सहभागीच झाली नव्हती असा ईडीचा आरोप आहे.

तसेच, 2004 ते 2010 या काळात मुंबईतील एससीआयएल कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष जेव्हीएस राव यांनी मेसर्स विपुल शिपयार्डसोबत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे.

गोव्यातील विपुल शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स विपुल शिपिंग इंजिनीअरिंग वर्क्स यांनी एससीआयएल कंपनीकडून 12.20 कोटींचे कंत्राट घेतल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

ईडीने गुन्ह्यातील आणि वैयक्तिक खात्यात जमा केलेली रक्कम देखील जप्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT