Rohan Harmalkar land fraud case Dainik Gomantak
गोवा

Rohan Harmalkar: रोहन हरमलकर गायब! 'काही' राजकारण्यांचे धाबे दणाणले; SIT नंतर आता ED चाही ससेमिरा

Rohan Harmalkar Land Scam Raid: एसआयटी’ने त्याच्याविरुद्ध जमीन हडप प्रकरणात चौकशी सुरू केल्यानंतर हरमलकर गायब झाला आहे. ईडीही त्याचा शोध घेत आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील जमीन हडपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने गोव्यात विविध ठिकाणी रोहन हरमलकर याच्या कार्यालये व घरावर छापे टाकून सुमारे १६०० कोटींच्या जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ‘एसआयटी’ने त्याच्याविरुद्ध जमीन हडप प्रकरणात चौकशी सुरू केल्यानंतर तो गायब झाला आहे. ईडीही त्याचा शोध घेत आहे.

हरमलकर याच्या कार्यालयावरील छाप्यांमुळे त्याच्याशी जवळीक असलेल्या काही राजकारण्यांचेही धाबे दणाणले आहेत. या बनावट दस्तावेजांची ‘एसआयटी’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

रोहन हरमलकर याने अपक्ष राहून मागील विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर तो राजकारणात सक्रीय झाला होता. त्यानंतर जमीन हडप प्रकरणांचा छडा लावण्यास एसआयटीने सुरुवात केल्यावर त्याचेही नाव पुढे आले होते.

गेल्यावर्षी हणजूण पोलिसांनी त्याच्यासह दोघांविरुद्ध एका दिल्लीच्या पर्यटकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वन खात्यानेही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांत आरोप निश्‍चित झालेले नाहीत. ईडीने त्याच्या पिळर्ण - पर्वरी येथील घराला सील ठोकले आहे तसेच कार्यालयातून बनावट दस्तावेज जप्त केले आहेत.

मर्सिडिज बेंझसह कोट्यवधीची मालमत्ता

रोहन हरमलकर याची ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, सिटीझन्स क्रेडिट सहकारी बँक, व्हीपीके अर्बन सहकारी बँक व सिंडिकेट बँकेत खाती आहेत. याशिवाय १ कोटी १३ लाखांची मर्सिडीज बेंझ व ९६.६५ लाखांची टोयोटा वेल्फायर हायब्रिड गाडी त्याच्या नावावर आहे. या व्यतिरिक्त कळंगुट येथे ७२५० चौ. फूट, हडफडे - नागोवा येथे ७५० चौ. फूट, हणजूण येथे १९७५० चौ. फूट, तसेच ३५०० चौ. फूट व गोलती येथे २०२५ चौ. फूट बांधकाम तसेच पिळर्ण येथे १०४० चौ. फूट फ्लॅट आहे. त्याची एकूण किंमत सुमारे ९.७७ कोटी आहे तर काही बँकांमधून त्याने १.८८ कोटीचे कर्ज घेतलेले आहे. ही माहिती त्याने विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT