E Garbage  Dainik Gomantak
गोवा

E Garbage : ‘ई-कचरा’ व्‍यवस्‍थापन मोहीम 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान

मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ई-कचरा हा घराघरातला प्रश्न झालेला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

E Garbage : : मडगाव, अपुऱ्या माहितीमुळे ‘ई-कचरा’ सामान्य कचऱ्यात मिसळून डंपिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचतो आणि समस्येचा ‘डोंगर’ उभा राहातो. जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.

त्यातील एक महत्त्वाची आणि तातडीने तोडगा काढण्याची गरज असलेली समस्या म्‍हणजेच ई-कचरा होय. लायन्स इंटरनॅशनल डिस्टिक्ट ३१७ बीने ‘ई-कचरा’ व्यवस्थापन मेगा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती लायन्स क्लबचे इर्ले ब्रिटो यांनी दिली.

कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल म्हणजे ई-कचरा. मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ई-कचरा हा घराघरातला प्रश्न झालेला आहे.

अगदी मोबाईल आणि संगणकापासून घड्याळ, बंद पडलेला रेडिओ या सगळ्या वस्तू ई-कचऱ्यात समाविष्ट होतात. या सगळ्या वस्तू नादुरुस्त झाल्या की त्या भंगारात

दिल्या जातात. त्या भंगारात देण्याऐवजी लायन्स इंटरनॅशनल डिस्टिक्ट ३१७ तर्फे राबविण्यात येणाऱ्या ई-कचरा संकलन मोहिमेत द्याव्यात, असे ब्रिटो यांनी सांगितले.

ई-कचरा जागृती मोहीम १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर आणि ई-कचरा संकलन मोहीम १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान राबविली जाणार आहे.

महिन्याभरात लायन्स शाळा, निवासी संकुल, महाविद्यालये, व्यावसायिक घरे या ठिकाणी मोहिमेचे आयोजन करतील. जबाबदारीने कचऱ्याची विल्हेवाट लावायला शिकत नाही. तोपर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल.

गोव्यात १३ ऑक्टोबर रोजी मडगावच्या दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे या मोहिमेचा उद्घाटन समारंभ होईल. पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला जय अमोल नाईक, अश्‍वीनीकुमार कर्पे व एण्‍ड्रियन टोरीस हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT