E vehicle in Goa Dainik Gomantak
गोवा

E vehicle : शेवटच्या दोन दिवसांत 166 ई-वाहनांची नोंदणी

वाहतूक खात्याची माहिती; अनुदान बंद करण्याच्या घोषणेनंतर ग्राहकांनी केली गर्दी

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान 1 ऑगस्टपासून बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर 30 आणि 31 जुलै रोजी वाहनांच्या नोंदणीसाठी वाहतूक खात्याची सर्व कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. या दोन दिवसांत एकूण 166 ई-वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती वाहतूक खात्याने दिली आहे.

केवळ 31 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या वाहनांवर अनुदान मिळणार असल्याने खात्याने लोकांच्या सोयीसाठी कार्यालये खुली ठेवली होती. त्याचा लाभ लोकांनी घेतलेला दिसतो.

अनुदान योजना संपुष्टात आली असून, याचा ई-वाहन विक्रीवर परिणाम होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुढील दोन महिन्यांची आकडेवारी आल्यानंतरच याचा अंदाज लावता येईल, असे मत तज्‍ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फक्त आमच्याच वाड्याला पाणी का नाही? पाळेवाडा-कोरगाववासीयांचा सवाल; दोन दिवसांत प्रश्‍न न सुटल्यास मोर्चाचा इशारा

पालिका बागेतील इमारत प्रकल्प रद्द करा! मडगाववासीय आक्रमक; जीएसआयडीसी, पालिकेच्या सादरीकरणात विसंगतीचा दावा

Nari Shakti Vandan Act: 'नारीशक्ती वंदन' विधेयक भविष्यात मंजूर होणार, काँग्रेसची भूमिका 'राष्ट्रविरोधी'- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सट्टेबाजीचा 'मास्टरमाईंड' बाबू खेमानीला मुंबईतून अटक, छाप्यांत सात जण ताब्यात; कोट्यवधींची उलाढाल

खरी कुजबुज: विरोधी आमदार आहेत कुठे?

SCROLL FOR NEXT