fake degree
fake degree 
गोवा

उपसभापतींच्या मुलाची पदवी बोगस

Dainik Gomantak

पणजी

उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदासाठी निवड झालेले उपसभापतींचे पुत्र रेमंड फिलीप फर्नांडिस यांचे नाव निवड यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्याची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची नसल्याने ही बोगस असल्याचे चौकशीत उघड असल्याचे उघड झाले होते. मुलाच्या नियुक्तीचा आदेश न काढल्याने अप्रत्यक्षपणे उपसभापतींना चांगलीच चपराक बसली आहे.
अव्वल कारकून पदासाठी १६ उमेदवारांपैकी १५ जणांना आजपासून कामावर सेवेत रूजू होण्यासाठी परवानगी देण्यात आली. अव्वल कारकून या पदासाठी रेमंड फिलीप फर्नांडिस याची पदवी बोगस असल्याची तक्रार ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली होती. याची दखल घेऊन त्याच्या शैक्षणिक पदवीची चौकशी करण्यात आली. ज्या विद्यापीठाकडून ही पदवी त्याने घेतली होती, त्याला मान्यताच नसल्याचे गोवा विद्यापीठाने केल्‍याचे तपासणीत आढळून आले होते व तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा रेमंड फर्नांडिस हा मुलगा असल्याने त्याला झुकपे माप देऊन निवड झाली असावी. या पदवीची तपासणी ज्या अधिकाऱ्यांनी केली होती, त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याची विनंती रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
रॉड्रिग्ज यांच्या तक्रारीमुळे मुख्य सचिवांनी अव्वल कारकून पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे तपासणी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आली होती. गोवा विद्यापीठाने रेमंड फर्नांडिस याने ज्या विद्यापीठामधून पदवी परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र मिळवले होते त्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस विद्यापीठांची तयार केलेल्या यादीमध्ये नाव होते. त्यामुळे या विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरता येत नाही. त्याने जी पदवी सादर केली होती ती लखनऊ येथील भारतीय शिक्षा परिषद या विद्यापीठाची होती. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात हे विद्यापीठ बोगस असल्याचे नमूद केले होते. त्याची प्रतही गोवा विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली होती. या चौकशीचा अहवाल त्यानंतर मुख्य सचिवांना पाठविल्यानंतर रेमंड फर्नांडिस हा या पदासाठी पात्र ठरत नसल्याने त्याचे नाव अव्वल कारकून यादीतून रद्द करून इतर निवड झालेल्या १५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT