Goa Beaches Dainik Gomantak
गोवा

गोव्यात येणार 'डच' संशोधक! डेल्टारस कंपनीसोबत करार; किनाऱ्यांची धूप होण्यामागची शोधणार कारणे

Goa News: किनाऱ्यांची धूप होण्यामागे पाण्याच्या प्रवाहात झालेले बदल, वादळ-वारे किंवा अन्य कोणती कारणे याला कारणीभूत आहेत याचा शास्त्रीय अभ्यास केला जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Coastal Erosion Dutch Researchers

पणजी: राज्यातील किनाऱ्यांची धूप होण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाय योजनांची शिफारस करण्यासाठी डच संशोधक गोव्यात येणार आहेत. गोवा सरकार आणि डेल्टारस या नेदरलँडच्या कंपनीशी केलेल्या कराराला आता केंद्र सरकारने मान्यता दिल्याने हे संशोधन मार्गी लागणार आहे.

यासाठी सरकार ३२ लाख रुपये खर्च करणार आहे. किनाऱ्यांची धूप होण्यामागे पाण्याच्या प्रवाहात झालेले बदल, वादळ-वारे किंवा अन्य कोणती कारणे याला कारणीभूत आहेत याचा शास्त्रीय अभ्यास केला जाणार आहे. केंद्र सरकारने हे काम करण्यास मान्यता दिल्याची माहिती राज्याचे पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी दिली.

राज्य सरकारने यापूर्वी केलेल्या पाहणीमध्ये २००४ पासून २०१६ पर्यंत किनारी भागातील १६ हेक्टर जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले होते. ही पाहणे अहमदाबाद येथील इस्रोच्या केंद्राने केली होती. सर्वात जास्त धूप ही कांदोळी किनाऱ्याची झाल्याचे त्यावेळी दिसून आले होते. रिव्हर प्रिन्सेस हे जहाज समुद्रात बुडाल्यानंतर किनाऱ्याची धूप होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रावरून दिसून आले होते.

सामंजस्य कराराला केंद्र सरकारची मान्यता

या पार्श्वभूमीवर नेदरलँडमधील ‘डेल्टारस’ या कंपनीने किनाऱ्यांची धूप का होते, याचा अभ्यास करून ती रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची तयारी दाखवली आहे. सरकार व कंपनीने सामंजस्य करार केला होता त्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिल्याने तो मार्गी लागला आहे.

याचा अभ्यास करण्यासाठी डच संशोधक तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर प्रथमच येणार आहेत. स्थानिक अधिकारी आणि संबंधित घटकांशी ते चर्चा करून धूप होण्याचा प्रश्न समजून घेणार आहेत. यानंतर शास्त्रीयदृष्ट्या धूप होण्याची कारणे ते शोधतील आणि धूप रोखण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना सुचवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT