Dust in madgaon Dainik Gomantak
गोवा

खड्डेमय रस्त्यांमुळे मडगावात धूळ

उन्हाळ्यात हॉटमिक्स केलेले रस्ते पावसाळ्यात उखडले

दैनिक गोमन्तक

मडगाव: उन्हाळ्यात हॉटमिक्स केलेले रस्ते पावसाळ्यात उखडून गेल्यानंतर आता पडू लागलेल्या उन्हामुळे मडगावात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होऊ लागले आहे व त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‍भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Dust in Madgaon due to potholes on roads in goa)

शहरातील प्रमुख चौकात उखडलेल्या रस्त्यांवर खडीची बारीक पूड जमली आहे. पावसाने थोडी उसंत घेतली अन् सुर्यकिरणांमूळे वाहने गेली की त्याबरोबर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याचा अनुभव मडगावकर घेत आहेत. ज्याचा परिणाम आता डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच पाठीचे आजार ही वाढण्याची शक्यता आहे.

बऱ्याचदा वाऱ्याबरोबर धूळीचे कण उडून चालकांच्या डोळ्यात जाण्याचे प्रकार घडत आहेत. ही धूळ प्रदूषण आरोग्यासाठी घातक असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच उन्हाची तीव्रता जस - जशी वाढत जाणार त्या प्रमाणात धुळीचे ही लोट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक

पावसाचे पाणी साठल्याने मडगाव परिसरात अनेक ठिकाणी रस्ते उखडले जात आहेत. त्यामूळे याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने लक्ष घालत ते दुरुस्थ करणे आवश्यक आहे. मात्र ही सतर्कता अद्याप बांधकाम खात्याने दाखवलेली नाही. तसेच खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचरही मडगावात आणलेला नाही. त्यामूळे नागरिकातून याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिक ही करु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT