Durgadas Kamat | Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Government : गोवा सरकारने 25 दिवसात 400 कोटींचं कर्ज घेतलं? दुर्गादास कामतांचा नेमका आरोप काय?

दुर्गादास कामत यांनी सरकारच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आदित्य जोशी

गोवा सरकारने गेल्या 25 दिवसांमध्ये तब्बल 400 कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी केला आहे. गोवा सरकार म्हणतंय की गोव्यात सरकारला कोणतीही अडचण नाही. मग सरकारला एवढं मोठं कर्ज का घ्यावं लागतंय? याचा सरळ अर्थ असा की सरकारकडे पैसा नाही. असं म्हणत कामत यांनी सरकारच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नेहमीच सांगत असतात की गोवा सरकारची आर्थिक स्थिती उत्तम आहे. जर हे खरं असेल तर सरकारने गेल्या 25 दिवसांमध्ये जवळपास 400 कोटींचं कर्ज का घेतलं याची माहिती सरकारने द्यावी. ज्याअर्थी सरकारने कर्ज घेतलंय त्याअर्थी सरकारची आर्थिक स्थिती ठीक नाही. इतकं असूनही गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडून वेगवेगळ्या इव्हेंट्सवर कोट्यवधींचा चुराडा करण्याचं काम सुरु आहे. हे सर्व इव्हेंट्स माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यमातून राबवले जात असून यासाठी पैसे नसतानाही कर्ज घेऊन उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे.

दरम्यान गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरदेसाईंनी ट्विट करत म्हटलंय की म्हादईचा प्रश्न सुनावणीसाठी आला असेल याबाबतही आपल्याला शंका आहे. याआधी मुख्यमंत्री म्हणाले होते की 5 जानेवारी रोजी म्हादईचा मुद्दा सुनावणीसाठी येईल. मात्र आज असा कोणताही विषय सुनावणीसाठी आलेला नाही. त्यामुळे सरकारची एकंदर भूमिकाच शंकास्पद असल्याचं सरदेसाईंनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT