Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट! गोवा आणखीन गारठणार....

Goa Weather Update: उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा : हवामानावरही परिणाम

दैनिक गोमन्तक

Goa Weather Update: देशातील 17 राज्ये थंडी आणि दाट धुक्याच्या विळख्यात आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये तर चक्क ‘कोल्ड-डे’ आहे. हवामान खात्याने गुरुवारी कडाक्याच्या थंडीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम गोव्यातील हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सियस इतके खाली घसरले असून येत्या दोन दिवसांत आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात पुढील 5 दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. 25 ते 27 जानेवारी या कालावधीत राज्यातील अधिक उंचीच्या भागांत हिमवृष्टी होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 28 आणि 29 जानेवारी रोजी अधिक उंच भागात तसेच मध्यम उंचीच्या भागात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

रात्री वाढतो थंडीचा कडाका

राज्यात शहरांपेक्षा घाटालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका वाढतो. दिवसा तापमान नियमित असते. मात्र, पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील तापमान 19 अंशांवर घसरले होते. आज पणजी येथे कमाल 30.5 अंश सेल्सिअस, तर किमान 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT