Ponda Fire Dainik Gomantak
गोवा

Ponda Fire: अग्निशामक दलाच्या सतर्कतेने फोंड्यातील 'ती' दुर्घटना टळली

या घटनेत मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात सध्या अपघातांसोबतच आगी लागण्याच्या घटना देखील घडत आहे. वाढत्या उन्हामुळे माळरानासह काजू बागांना मोठ्या प्रमाणावर आगी लागत आहेत. तसेच काही वेळेला शॉर्ट सर्किटमुळे देखील अनेक आस्थापने, फ्लॅटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याच्या घटना घडतात.

मात्र अग्निशामक दल अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवत असून आज फोंड्यात अशाच एका घटनेत अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

फोंड्यातील प्रिन्सेस हेरिटेज इमारतीतल्या तिसऱ्या मजल्यावरील व्हॅलेंटिना फर्नांडिस यांच्या फ्लॅट मधील एक्झॉस्ट फॅनला आज संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

सदर घटनेचे वृत्त समजताच अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अद्याप मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT