Walwanti River Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यभरात सुखावणारी संततधार

राज्यात पेरण्यांना वेग : पाऊस समाधानकारक; शेतकरी लागले कामाला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update राज्यात उशिरा दाखल झालेला नैऋत्य मॉन्सून आता स्थिरावू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत या विक्रमी पावसाने महिन्याभरातील तूट भरून काढणे सुरूच ठेवले असून येत्या काही दिवसांत ही तूट भरून निघेल, अशी शक्यता आहे.

गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकरीवर्ग कमालीचा सुखावला असून शेतीकामांना वेग आला आहे. धरणांतील पाणीसाठ्यांतही जोमाने वाढ होताना दिसत आहे. एकूणच हा संततधार पाऊस सर्वांनाच सुखावणारा आहे.

मॉन्सून केरळात वेळेत दाखल होतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मॉन्सून विस्कळीत झाला. परिणामी राज्यात मॉन्सून दाखल होण्याला उशीर झाला.

११ जूनला मॉन्सून दाखल होऊनही २३ जूनपर्यंत पावसाने हुलकावणी दिली होती. अखेर २३ जूनपासून मॉन्सून खऱ्या अर्थाने गतिमान झालाच, शिवाय तो मुसळधारपणे बरसत आहे. २७ जून रोजी या हंगामातील आतापर्यंतचा विक्रमी १४२.५ मिलीमीटर पाऊस पडला.

तरीही राज्यात पावसाची ३५ टक्के तूट आहे. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही तूट भरून निघत असून पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.

राज्यात १ लाख २६ हजार १४१ हेक्टर कृषी उत्पन्नयोग्य शेतजमीन असून खरीप हंगामात २३ हजार २८८ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड होते, तर २९४३ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. हे सर्व कृषी उत्पन्न मॉन्सूनवरच अवलंबून आहे.

गेल्या आठवडाभरात पडणाऱ्या पावसामुळे शेतीकामांना वेग आला आहे. रान करणे, नांगरणीला सुरुवात झाली असून सुरवातीच्या टप्प्यात मोड आणून बी पेरणी केली जात आहे, तर भातरोपणीही सुरू झाली आहे.

याबाबतची निश्‍चित आकडेवारी कृषी खात्याकडे उपलब्ध नसली तरी येत्या आठवड्यात याबाबतचा तपशील हाती येईल. मात्र, सध्या पडणारा पाऊस शेतीसाठी पूरक असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत, अशी माहिती कृषी संचालक नोएल अल्फान्सो यांनी दिली.

मुसळधार पर्जन्याने नाले प्रवाहीत

गेल्या शुक्रवारपासून राज्यात सुरू झालेल्या पावसाने कहर केला आहे. गुरुवारी साखळीला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे संध्याकाळी साखळीत सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले. साखळीतील सर्व नाले प्रवाहीत झाले असून वाळवंटी नदीचे पाणीही वाढले आहे.

गुरुवारी दुपारनंतर पावसाने बराच जोर धरला. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस नसल्याने धरणातून पाणी नदीत सोडणे सुरूच होते. नदी ओसंडून वाहू लागल्याने बंधाऱ्यांच्या फळ्या काढून ठेवल्या.

काही ठिकाणी ‘झाडा’झडती

पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराशेजारील कोकणी कॅन्टीनलगतचे भले मोठे आंब्याचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

मात्र, झाडाशेजारी उभी केलेली वाहने तसेच कॅन्टीनचे काही प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ हे झाड रस्त्यावरून बाजूला केले. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ५६ मिमी पाऊस पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT