Goa Monsoon Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Updates: जोर वाढलेलाच; सरासरीत 5 टक्के वाढ

पावसामुळे गोव्यातील मिरामार किनाऱ्यावर पर्यटकांची तारांबळ उडाली

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात पावसाचा (Goa Monsoon) जोर वाढल्याने गणेशभक्तांची (Ganapati) पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. त्याशिवाय बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला. आधीच कोविड महामारी (Covid-19) आणि संचारबंदीमुळे व्यापारीवर्ग हैराण झाला असून ऐन सणात पावसाने हजेरी लावून त्यांच्या कमाईवर विरजण टाकले आहे. विशेष म्हणजे, काल सोमवारी पावसाच्या सरासरीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पावसाची सरासरी तब्बल आठ टक्क्यांपर्यंत घटली होती.

सांगे, केपे, वाळपईत सर्वाधिक

राज्यात सांगे, केपे, वाळपई आणि पेडणे परिसराला आज पावसाने सोमवारी अक्षरशः झोडपून काढले. सांगेत दिवसभरात 3 इंच तर केपेत 2.2 इंच पावसाची नोंद झाली. राज्यभरात 1.2 इंच पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. तसेच जे कामानिमित्त घराबाहेर पडले, त्यांना रस्त्यात साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला. आणखी दोन दिवस राज्‍यात पावसाचा जोर कायम राहणार असून ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.

Goa Monsoon Updates: सोमवारचा पाऊस

आतापर्यंत 116.5"

सोमवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर काही काळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाने झोडपले. राज्यात आतापर्यंत 116.5" इंच पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने काही दिवस पावसाची रिपरिप राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT